वेडनेसडे 2 लवकरच झळकणार
जादुई शक्ती असलेली युवती पुन्हा दाखविणार कमाल
हॉलिवूडची आकर्षक वेबसीरिज म्हणून वेडनेसडेचे नाव घेतले जाते. सुमारे 3 वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या स्वत:च्या पहिल्या सीझनद्वारे या सीरिजने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. भारतीय प्रेक्षकांकडुन देखील हॉलिवूड अभिनेत्री जेना ओर्टेगाची मुख्य भूमिका असलेल्या वेडनेसडेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
याचमुळे निर्माते आता याचा दुसरा सीझन घेऊन येत आहेत. याचा टीझर जारी करण्यात आला आहे. पहिल्या सीझनच्या अपार यशानंतर निर्मात्यांनी वेडनेसडे सीझन 2 ची घोषणा केली होती. याच्या टीजरमध्ये वेडनेसडे एडम एका नव्या अॅडव्हेंचरसाठी तयार असल्याचे दिसून येते. यात जादुई शक्ती असलेली युवती अनोखी कमाल करताना दिसून येणार आहे. याचबरोबर एक हॉरर डॉलची एंट्री होणार आहे.
वेडनेसडे 2 चा पहिला पार्ट 6 ऑगस्टपासून पाहता येणार आहे. याचा दुसरा पार्ट 3 सप्टेंबर रोजी स्ट्रीम होणार आहे. अशाप्रकारे वेडनेसडे सीझन 2 ला दोन वेगवेगळ्या हिस्स्यांमध्ये स्ट्रीम केले जाणार आहे.