मार्शच्या जागी वेबस्टर
वृत्तसंस्था/सिडनी
भारताविऊद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात अष्टपैलू खेळाडू ब्यू वेबस्टर हा फॉर्मात नसलेल्या मिचेल मार्शच्या जागी स्थान घेईल, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने गुऊवारी येथे सांगितले. 33 वर्षीय मार्शने चार कसोटी सामन्यांच्या सात डावांत केवळ 73 धावा केल्या आहेत. कमिन्सने हेच त्याला वगळण्याचे कारण असल्याचे सांगितले. मार्शने या मालिकेत आतापर्यंत केवळ 33 षटके टाकली असून त्यात केवळ तीन बळी घेतले आहेत. दुसरीकडे, नोव्हेंबरमध्ये भारत ‘अ’विऊद्ध खेळलेल्या 31 वर्षीय वेबस्टरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 5247 धावा केल्या आहेत आणि 148 बळी घेतले आहेत. वेबस्टर शेफिल्ड शिल्डमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये राहिलेला आहे. कमिन्सने यावेळी मिशेल स्टार्कच्या फिटनेसविषयीच्या शंकांना विराम दिला आणि तो खेळणार असल्याचे सांगितले.