महाराणी गायत्रीदेवींवर येणार वेबसीरिज
सीझन तयार करण्याची तयारी
दोन ओटीटीच्या जगतात आता एका राजघराण्याची कहाणी दिसून येणार आहे. ही कहाणी जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवी यांची असून त्यांच्यावर आधारित वेबसीरिज प्रांजल खंधाडिया यांच्याकडून निर्माण केली जाणार आहे. महाराणी गायत्री देवी यांची कहाणी केवळ शाही स्टेट्स नाही तर आत्मविश्वास आणि धाडसी निर्णयांचे उदाहरण देणारी गाथा आहे. ही एका अशा महिलेची कथा आहे जिने हिंमत दाखवत इतरांसमोर उदाहरण सादर केले. या सीरिजकरता आम्ह 4 वर्षे संशोधन केले आहे. जयपूरच्या राजघराण्याकडून याकरता हिरवा कंदील मिळाला आहे. महाराणी गायत्री देवी यांच्यावर आधारित वेबसीरिजचे दोन सीझन असतील, ज्यातील प्रत्येक सीझनमध्ये 8 एपिसोड्स असतील अशी माहिती प्रांजल यांनी दिली.
निर्मात्यांनी अद्याप कलाकारांची निवड केलेली नाही, सध्या कहाणी अन् संवादलेखनाचे काम सुरू आहे. सीरिजमध्ये गायत्री देवी यांचे आयुष्य बालपणापासून वृद्धत्वापर्यंत दाखविले जाणार आहे.ही देशातील आतापर्यंतची सर्वात भव्य सीरिज ठरणार आहे. सीरिजमध्ये केवळ जयपूर नव्हे तर कूचबिहार आणि बडौदाची कहाणीही दाखविली जाईल. गायत्री देवी यांच्या पूर्वजांचा बडौदाशी संबंध होता. या सीरिजचे चित्रिकरण ब्रिटन अन् अमेरिकेतही केले जाणार आहे. महाराणी गायत्री देवी यांची क्वीन एलिझाबेथ यांच्याशी मैत्री होती. त्या काळात त्यांना अमेरिकेच्या व्हाइट हाउसमध्येही निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे पती मान सिंह हे स्पेनमधील राजदूत होते.