वेदराल्ड इंग्लीश कौंटीत खेळणार
वृत्तसंस्था/ लंडन
2026 च्या इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघातील सलामीचा फलंदाज जॅक वेदराल्ड लिसेस्टरशायर संघांकडून खेळणार आहे. वेदराल्डचे लंडनमध्ये आगमन झाले आहे.
इंग्लंडविरुद्ध गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या अॅशेस मालिकेतील वेदराल्डने आपले कसोटी पदार्पण केले होते. या मालिकेत डावखुऱ्या वेदराल्डने 22.33 धावांच्या सरासरीने 201 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत इंग्लंडचा 4-1 अशा फरकाने पराभव केला. वेदराल्डने प्रथमश्रेमी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 85 सामन्यांत 36.84 धावांच्या सरासरीने 5784 धावा जमविल्याअसून त्यात 13 शतकांचा समावेश आहे.
आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत येत्या ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ बांगलादेशमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या कसोटी मालिका द. आफ्रिका, न्यूझीलंड आणि भारताबरोबर होत आहेत. या मालिकांमध्ये दर्जेदार कामगिरी करण्यासाठी वेदराल्डने इंग्लीश कौंटी क्रिकेटमध्ये सरावाच्या दृष्टिकोनातून लिसेस्टर क्लबशी खेळण्याचा निर्णय घेतला आहे.