For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-श्रीलंका उपांत्य सामन्यापूर्वी हवामानाचीच जास्त चर्चा

06:14 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत श्रीलंका उपांत्य सामन्यापूर्वी हवामानाचीच जास्त चर्चा
Advertisement

वृत्तसंस्था, निशिन : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुऊषांच्या क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत आज गुऊवारी भारताचा सामना श्रीलंकेच्या दुय्यम संघाशी होणार आहे. पावसाचा व्यत्यय आल्याने भारताच्या तयारीवर परिणाम झाला असून पूर्ण ताकदीचा संघ असूनही त्यांना सरावाच्या अभावामुळे काहीशा लय हरवलेल्या स्थितीत खेळावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना परिस्थितीशी वेगाने जुळवून घ्यावे लागेल.

Advertisement

नागोयामध्ये दाखल झाल्यापासून मुसळधार पावसामुळे भारताला फारसा सराव करता आलेला नाही. वास्तविक उपांत्य सामन्याच्या आदल्या दिवशी आकाश निरभ्र झाल्यावरच त्यांचे एकमेव योग्य सराव सत्र आयोजित करण्यात आले. तथापि, गुऊवारी आणि शुक्रवारी हवामान अनुकूल राहण्याचा अंदाज आहे. मात्र शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यादरम्यान पुन्हा पावसाचे संकट ओढवू शकते. याआधीचे चारही उपांत्यपूर्व सामने रद्द करावे लागले होते आणि संघांनी त्यांच्या आयसीसी मानांकनांच्या आधारे पुढील फेरी गाठली आहे.

थोडक्यात सांगायचे तर, उपांत्य फेरीत पोहोचलेल्या चारही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेत प्रत्यक्ष खेळ केलेला नाही. दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाईल. सलग दोनदा टी-20 विश्वचषक जिंकणारा भारत सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार आहे. जर गुऊवारी हवामान अनुकूल राहिले, तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघासाठी हा सामना सहज जिंकण्यासारखा असेल. कारण श्रीलंका येथे आपला सर्वांत मजबूत संघ घेऊन आलेला नाही.

Advertisement

साखळी सामने कमी धावसंख्येचे ठरले होते आणि पावसामुळे खेळपट्टीच्या पृष्ठभागाखाली ओलावा टिकून राहिल्याने खेळपट्टी संथ आणि जड होण्याची शक्यता आहे. 20 सप्टेंबर रोजी जपानमध्ये दाखल झाल्यानंतर भारताला टोकियोजवळ जपानविऊद्ध केवळ 5 षटकांचा द्विपक्षीय सामना खेळण्याची संधी मिळालेली आहे. अफगाणिस्तानविऊद्धचा उपांत्यपूर्व सामना पावसामुळे रद्द होण्यापूर्वी अय्यरने मान्य केले होते की, खराब हवामानामुळे सरावाचा अभाव ही एक समस्या आहे. परंतु व्यावसायिक खेळाडू या नात्याने मैदानावरच्या कामगिरीसाठी हे कारण पुढे करता येणार नाही, असेही त्याने म्हटले होते.

जर उपांत्य सामनाही पावसामुळे रद्द झाला, तर आयसीसी मानांकनातील पहिल्या स्थानामुळे भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल. श्रीलंका नवव्या, तर पाकिस्तान सहाव्या आणि बांगलादेश आठव्या स्थानावर आहे. जर दुसऱ्या उपांत्य सामन्यावरही पावसाचा परिणाम झाला, तर पाकिस्तान त्यांच्या सरस मानांकनामुळे पुढील फेरीत प्रवेश करेल. 3 ऑक्टोबरला होणाऱ्या अंतिम फेरीवेळी हवामान खराब झाल्यास सुवर्णपदक वाटून घेतले जाईल.

संघ : भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, यश ठाकूर, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, वैभव सूर्यवंशी, विपराज निगम.

श्रीलंका : सहान अरचिगे (कर्णधार), अशेन बंदारा, लसिथ क्रोस्पुल, सिनेथ जयवर्धने, निरोशन डिकवेला, नुवानिडू फर्नांडो, चमिका कऊणारत्ने, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो, विजयकांत व्यासकांत, नुवान तुषारा, थारिंदू रत्नायके, वानुजा सहान, सोहन डी लिवेरा, गरूका संकेथ.

सामन्याची वेळ : सकाळी 10 वा.

Advertisement
Tags :

.