Kolhapur News : कोल्हापूरसह राज्यात हवामानाचा लहरीपणा; थंडी गायब, उकाडा वाढला
उकाडा आणि ढगाळ वातावरणाची हजेरी
कोल्हापूर : राज्यातील हवामानात सध्या मोठे आणि अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. हिवाळा आता कमी होत आहे. त्याजागी उकाडा आणि ढगाळ वातावरणाने हजेरी लावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना एकाचवेळी थंडी, पाऊस आणि उकाडा असे तिन्ही ऋतू अनुभवायला मिळत आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनावरही याचा परिणाम होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर कायम होता. सकाळी आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवत होती. १ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पावसानंतर हवामानातआरोग्याची काळजी घ्या!
हवामान बदलांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी तसेच श्वसनविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
सातत्याने बदल होत आहेत. काही भागांत हलक्या सरी पडत असून, तर काही ठिकाणी दिवसभर ढगाळ बाताबरण कायम आहे. परिणामी, थंडी कमी होत असून उकाडा आणि दमटपणा वाढत आहे.
