ड्रोनने टाकलेली शस्त्र सांबा सीमेजवळ जप्त
06:41 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ श्रीनगर
Advertisement
जम्मू काश्मीरच्या सांबा जिह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळून शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही शस्त्रे पाकिस्तानातून ड्रोनने टाकण्यात आली होती. या शस्त्रसाठ्यात दोन पिस्तूल, तीन मॅगझिन, 16 राउंड आणि एक ग्रेनेड होते. सीमेपलीकडून संशयास्पद ड्रोन हालचालींची माहिती मिळाल्यानंतर, सीमा सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष दलाने केलेल्या संयुक्त कारवाईत घागवालच्या पलुरा गावात शोध मोहीम राबवत ही कारवाई केली. तपासणीवेळी नाल्याच्या काठावर पिवळ्या टेपने गुंडाळलेले एक पॅकेट सापडले असून त्यामध्ये शस्त्रs सापडली आहेत.
Advertisement
Advertisement