छावा चित्रपटात कोणत्याही चुका राहू नयेत अशी आमची इच्छा
संभाजीराजे यांच्या जीवनावर चित्रपट येतोय ही आनंदाची बाब
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती
कोल्हापूर
छावा चित्रपटात संभाजीराजे हे लेझिमवर नृत्य करताना दिसले आहेत. झिम खेळताना दाखविणे चुकीचे नाही, पण ते लेझिमवर नृत्य करताना दाखविले आहे. सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी याला देखील काही मर्यादा आहे. संभाजी राजे यांच्या जीवनावर छावा चित्रपट होतोय ही आनंदाची बाब, असे वक्यव्य माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले, चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी माझी भेट घेतली होती, त्यावेळेला सर्व चित्रपट झाल्यानंतर तो चित्रपट इतिहास अभ्यासकांसोबत दाखवा अशी विनंती केली होती. आता देखील त्यांना विनंती आहे, त्यांनी आम्हाला आणि इतिहास संशोधकांना तो चित्रपट दाखवावा. छत्रपती संभाजी महाराज याच्या जीवनावर चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक उत्तेकर एक मराठी माणूस आहे त्यांनी खूप मोठं धाडस करून संभाजी महाराजांवर चित्रपट बनवला आहे. त्यामुळे यामध्ये कुठलेही चुका राहू नयेत अशीच आमची ही इच्छा आहे.