For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युक्रेनसारखी अवस्था करू !

06:27 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
युक्रेनसारखी अवस्था करू
Advertisement

पुतीन यांची भारताचा मित्रदेश आर्मेनियाला धमकी : युरोपीय महासंघाशी जवळीक न साधण्याची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचे 2 सर्वात निकटवर्तीय मित्र रशिया आणि आर्मेनिया यांच्यातील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी आर्मेनिया पाश्चिमात्यांच्या गोटात शिरू नये यासाठी दबाव वाढविला आहे. रशिया आणि आर्मेनिया दोन्ही देश दशकांपासून सहकारी राहिले आहेत, परंतु अझरबैजान विरोधातील युद्धात रशियाने साथ न दिल्याने आर्मेनियाने आता पाश्चिमात्य देशांसोबत मैत्री वाढविण्यास सुरवात केली आहे. तर आर्मेनियाला पुतीन यांनी एकप्रकारे युक्रेनसारखी अवस्था करू अशी धमकी दिली आहे.

Advertisement

आतापर्यंत रशियाकडून शस्त्रास्त्रs खरेदी करणारा आर्मेनिया आत भारत, इराण आणि युरोपकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रs खरेदी करत आहे. आर्मेनियाने रशियाच्या नेतृत्वाखालील यूरेशियन इकोनॉमिक युनियनमधून बाहेर पडत युरोपीय महासंघात सामील होण्याच्या निर्णयावर तत्काळ जनमत चाचणी करावी असा पुतीन यांचा आग्रह आहे. तर आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पश्नियान यांनी ही मागणी फेटाळली आहे.

आर्मेनियाचे पंतप्रधान पश्नियान यांनी पुतीन यांच्यासोबत फोनवरून झालेल्या चर्चेदरम्यान जनमत चाचणीची मागणी फेटाळली होती. पश्नियान यांच्या या निर्णयामुळे रशियाला मोठा झटका बसला आहे. आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी रशियाच्या मागणीला अयोग्य ठरविले आहे.

आर्मेनियाने पाश्चिमात्य देशांच्या गोटापासून दूर रहावे याकरता रशियाने दबाव वाढविला आहे. 29 मे रोजी कजाकस्तानमध्ये ईएईयूच्या परिषदेत  रशिया, बेलारुस, कजाकस्तान आणि किर्गिस्तान यांनी एक संयुक्त वक्तव्य जारी करत आर्मेनियाने युरोपीय महासंघात सामील होण्याच्या मुद्द्यावर जनमत चाचणी आयोजित करावी अशी मागणी केली होती.

पुतीन यांची धमकी

युरोपीय संघ आणि ईएईयूचे एकाचवेळी सदस्यत्व अशक्य असल्याचे रशियाच्या नेत्याने स्पष्ट केले आहे. पुतीन यांनी एकप्रकारे आर्मेनियाला त्याची अवस्था युक्रेनसारखी होऊ शकते अशी धमकी दिली आहे. युक्रेन युरोपीय महासंघाचे सदस्यत्व इच्छित होता आणि याचमुळे युद्धाची स्थिती निर्माण झाल्याचे रशियाने निदर्शनास आणून दिले आहे.

आर्थिक झटका

ईएईयूसोबत आमचे सरकार तोपर्यंत काम करत राहणार आहे, जोपर्यंत आम्हाला रोखले जात नाही असे आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. रशियासोबतचे संबंध ‘संक्रमणा’तून जात आहेत असेही त्यांनी नमूद केले आहे. आर्मेनियात 7 जून रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. रशियाने आर्मेनियातील स्वत:च्या राजदूताला माघारी बोलाविले आहे. याचबरोबर रशियाने आर्मेनियातून होणारी मासे अन् सागरी खाद्याची आयात रोखली आहे. यामुळे आर्मेनियाला आर्थिक झटका बसला आहे. रशिया अर्थव्यवस्थेला आघात करत आर्मेनियाच्या निवडणुकीला प्रभावित करू पाहत असल्याचा आरोप युरोपीय महासंघाने केला आहे.

नागार्नो काराबाख कनेक्शन

एकेकाळी आर्मेनिया हा रशियाची वसाहत असणारा देश राहिला होता. याचमुळे आर्मेनियावरील रशियाची पकड कायम रहावी अशी पुतीन यांची इच्छा आहे. 2023 मध्ये अझरबैजानने आर्मेनियाशी संघर्ष करत नागार्नो काराबाख भूभागावर कब्जा केला होता. आर्मेनियाने या संघर्षादरम्यान रशियाकडे मदतीसाठी धाव घेतली होती. परंतु रशिया स्वत: युक्रेन युद्धात गुंतला होता आणि त्याने कुठलीच मदत केली नव्हती.  पराभवानंतर आर्मेनियाने भारत तसेच इराणकडून शस्त्रास्त्र खरेदी वाढवत रशियावरील निर्भरता घटविली आहे. आर्मेनिया आता युव्रेनसोबत संबंधही मजबूत करत आहे.

Advertisement
Tags :

.