महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पर्यटकांना लुबाडणाऱ्या हॉटेलांचे परवाने निलंबित करू

11:09 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा हॉटेल व्यावसायिकांना इशारा

Advertisement

पणजी : राज्यात नववर्ष व नाताळ सणाची धामधूम सुरू आहे. अशातच पर्यटक गोव्याच्या दिशेने आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत. जर एखाद्या हॉटेल व्यावसायिकांकडून पर्यटकांची लुबाडणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या व्यवसायाचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. पर्वरी येथील मंत्रालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. मुख्यमंत्री म्हणाले, पर्यटकांना उत्तम सोयी-सुविधा पुरवणे हे प्रत्येक हॉटेल व्यावसायिकाचे कर्तव्य आहे. यामध्ये हलगर्जीपणा झाल्यास आणि पर्यटकांची फसवणूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम हॉटेल व्यावसायिकांना भोगावे लागणार आहेत.  वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पर्यटकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर वाहतूक पोलीस कारवाई करतील.

Advertisement

डान्सबारवर बंदी आणणार

राज्यात जर कुणी बेकायदेशीर डान्सबार चालवत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही. कारण डान्सबारच्या नावाखाली अवैध व्यवसाय करण्यात अनेकजण धन्यता मानतात आणि त्यामुळे पर्यटक तसेच राज्यातील जनतेलाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. अशा गैरकृत्यांची पोलिसांत तक्रार झाल्यानंतर डान्सबारवर कायमस्वऊपी बंदी आणण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article