महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बांधकाम कामगारांच्या समस्या 15 दिवसांत सोडवू

10:29 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बांधकाम कामगारांच्या समस्या 15 दिवसांत सोडवू, असे आश्वासन कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दिले आहे. जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी गुरुवारी मजगाव येथील कामगार कार्यालयात बैठक घेऊन मागणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी निश्चितच या सर्व समस्या सोडविल्या जातील, असे सांगितले. मयत झालेल्या बांधकाम कामगारांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळाली नाही. नियमानुसार त्यांना वेळेत नुकसानभरपाई द्यावी. याचबरोबर विवाह झाल्यानंतर कामगारांना तातडीने निधी द्यावा. कामगाराला आरोग्य समस्या निर्माण झाल्यानंतर उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होताच त्यांना दवाखान्याचा खर्च द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. कामगारांच्या ओळखपत्राचे नूतनीकरण करताना नाहक त्रास दिला जात आहे. तो देखील दूर करणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे आता कामगारांच्या मुलांना विविध शाळांमध्ये नव्याने प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यावेळी त्यांना उपलब्ध सुविधा पुरवाव्यात, असेही सांगण्यात आले. 16 मे पर्यंत या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन कामगार कार्यालयातील अधिकारी तरुनम् बेंगाली यांनी दिले. यावेळी अॅड. एन. आर. लातूर, अॅड. जी. ए. हिरेमठ, सुनील गावडे, अॅड. कीर्ती कांबळे, शितल बिलावर, जोतिबा पाटील, रमेश काकतीकर, सुरेश मऱ्याकाचे यांच्यासह कामगार उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article