For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Politics | जशास तसे उत्तर देऊ ; विश्वजीत कदमांचा इशारा

05:29 PM Jan 06, 2026 IST | NEETA POTDAR
sangli politics   जशास तसे उत्तर देऊ   विश्वजीत कदमांचा इशारा
Advertisement

                               संजयनगरमध्ये काँग्रेस सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद,

Advertisement

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मधील संजयनगर येथे काँग्रेसच्या प्रचारार्थ भव्य सभा पार पडली. खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रभागातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश सर्जे, अश्विनी कोळेकर, अंजली जाधव आणि हर्षवर्धन पाटील यांनी सभा संबोधित केली. त्यांनी प्रभागातील मागील पाच वर्षातील रखडलेले विकासकाम, मूलभूत सुविधा आणि नागरिकाभिमुख योजना यावर भर देत अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आणि पुढील विकासासाठी मतदारांनी काँग्रेसला पाठबळ देण्याचे आवाहन केले.

Advertisement

सभेत प्रभागातील सामाजिक उपक्रमांत सक्रिय कार्यकर्ते दीपक माने यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या स्वागतावेळी खासदार विशाल पाटील यांनी प्रभागाचा विकास, युवा व अनुभवी कार्यकर्त्यांचा सहभाग आणि लोकाभिमुख योजनांना प्राधान्य देण्याचे मुद्दे मांडले. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी स्पष्ट केले की, काही उमेदवारांनी अनुभवामुळे आधीच चांगले काम केले आहे तर काही नवीन उमेदवारांनी चांगले शिकले आहे. त्यामुळे प्रभागाचा रखडलेला विकास पूर्ण होऊन पुढील काळात चांगला विकास होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.