For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लवकरच जात जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध करू!

06:17 AM Feb 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
लवकरच जात जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध करू
Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा : सर्व विषयांवरील चर्चेनंतर निर्णय

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

आणखी एका महिन्यात जात जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध केला जाईल. जास्तीत जास्त दोन महिन्यांत आम्ही जात जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध करू. यापूर्वीच सर्वेक्षण पूर्ण झाले असून अद्याप अहवाल सादर करण्यात आलेला नाही. अहवाल सादर करताच आम्ही ते स्वीकारून प्रसिद्ध करू. अहवालातील सर्व विषयांवर चर्चा करून निर्णय घेऊ, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. रविवारी रायचूर जिल्ह्यातील कागिनेले महासंस्थान कनक गुरुपीठ तिंथणी ब्रिड्जकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले, कनक गुऊपीठ राज्यात धर्मनिरपेक्ष पीठ म्हणून काम करत आहे. पूज्यश्री सिद्धरामानंदपुरी स्वामीजींनी गुऊपीठात शिक्षण, अध्यात्म आणि धर्मनिरपेक्षतेवर खूप भर दिला होता. 1992 मध्ये पहिल्यांदाच धनगर समुदायासाठी कागिनेले गुऊपीठाची स्थापना करण्यात आली. श्री तारकानंद स्वामीजी हे त्याचे पहिले गुऊ होते. कल्याण कर्नाटक, बेंगळूर, म्हैसूर मुंबई कर्नाटक विभाग असून या सर्व विभागांसाठी स्वतंत्र गुऊ आहेत. श्री सिद्धरामनंदपुरी स्वामीजी हे या विभागाचे गुऊ होते. गुऊपीठात शिक्षण, अध्यात्म आणि धर्मनिरपेक्षतेवर खूप भर देण्यात आला होता. कागिनेले गुऊपीठाच्या स्थापनेचा उद्देश समान समाज निर्माण करणे आहे, असे त्यांनी सांगितले.

धनगर समाज अनुसूचित जमातीत समावेश करण्याची शिफारस

कनकगुऊ पीठ संपूर्ण राज्यासाठी धर्मनिरपेक्ष पीठ म्हणून काम करत आहे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आणि तीर्थक्षेत्र निवासस्थानांसह अनेक मागण्यांसाठी अनुदान दिले जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. सर्व दलित आणि मागासवर्गीय मठांसाठी बेंगळूरमध्ये सुमारे 50 एकर जमीन देण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. धनगर समाजाला अनुसूचित जातीच्या वर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेईल. राज्य सरकारने यापूर्वीच केंद्राला शिफारस सादर केली आहे, अशी माहिती सिद्धरामय्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.