For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिलारीचे पाणी बेळगावला आणण्यासाठी प्रयत्न करू

07:58 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
तिलारीचे पाणी बेळगावला आणण्यासाठी प्रयत्न करू
Advertisement

पालकमंत्र्यांचे माजी नगरसेवकांना आश्वासन

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

चंदगड येथील तिलारी धरणाचे अतिरिक्त पाणी बेळगाव शहराला आणण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर या दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले.

Advertisement

मंगळवारी माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर तिलारी पाणी प्रश्नाबाबत माहिती देण्यात आली. राकसकोप व हिडकल या दोन धरणांच्या पाण्यावर शहराला अवलंबून राहावे लागत आहे. परंतु मे महिन्यात पाण्याची टंचाई जाणवत आहे. बेळगाव तालुक्याच्या शेजारीच असलेल्या चंदगडमध्ये तिलारी धरणाचा पाणीसाठा होतो. या धरणाचे वीज निर्मितीनंतरचे अतिरिक्त पाणी गोव्याला वाहून जात आहे. त्यामुळे हे पाणी बेळगावला वळविल्यास शहराचा पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे पालकमंत्र्यांना सांगण्यात आले.

केवळ बेळगावच नाही तर चंदगड तालुक्यालाही या नियोजित प्रकल्पाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. पालकमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील, माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी सुंठकर, जनरल सेक्रेटरी दीपक वाघेला, जॉईंट सेक्रेटरी संजीव प्रभू, वंदना बेळगुंदकर, किरण सायनाक, लतीफ पठाण, युनुस मोमीन, मोहम्मद पीरजादे, सादिक इनामदार, एपीएमसीचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब जाधव, शाम कोलकार, अनिल पाटील, अनुश्री देशपांडे, राजश्री तिरकण्णावर यांसह इतर उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.