For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाकिघोल रस्त्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करू

01:52 PM Dec 31, 2024 IST | Pooja Marathe
वाकिघोल रस्त्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करू
We will make efforts at the central level for the Wakighol road.
Advertisement

खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची ग्वाही
रस्त्याची पाहणी करून आढावा बैठक
कोल्हापूर
राधानगरी तालुक्यातील अनेक वर्षे प्रलंबित असा, ९कि. मि. रस्ता अद्यापही कच्चा रस्ता आहे, हा रस्ता पूर्ण झाल्यास येथील नागरिकांचा ३० ते ४० किलोमीटरचा प्रवास कमी होणार आहे. या वाकीघोल रस्त्यासाठी केंद्र शासनातर्फे लागेल तो पाठपुरवठा करू असे आश्वासन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी यावेळी दिले. राधानगरी येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. दरम्यान शाहूवाडी तालुक्यातील पाच एकर जमीन वन विभागाला हस्तांतर करून हा रस्ता पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयारी दर्शवल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी गोकुळ संचालक अभिजीत तायशेटे म्हणाले, तालुक्याचा विकास पर्यटनावर अवलंबून असल्याने राधानगरी धरणावर वृंदावन गार्डन , बोटिंग, परीसर सुशोभीकरण असा तीस कोटीचा प्रस्ताव पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी देऊन निधीची तरतूद करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी दाजीपूर ते राधानगरी रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेसंदर्भात अधिकाऱ्यांना धारेवर धरून या रस्त्याच्या दुतर्फा साईट पट्ट्या भरलेला नसल्याने सतत अपघात होतात. नवीन रस्ता वर्षभरात खराब झाल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे डी एल हजारे, अभियंता शिवाजीराव इंगवले, अभिजीत तायशेटे, उपअभियंता प्रवीण पारकर, वन विभागाचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील, हे जेवढे सरपंच प्रतिभा कासार माजी उपसरपंच दिपाली पोकम, माजी सरपंच विश्वास राऊत, भरत कासार, गणी चोचे, माजी सरपंच दादासो सांगावकर कुडुत्रीचे सरपंच शिवाजी चौगले, माजी उपसरपंच रमेश पाटील (बचाटे),बशीर राऊत, संजय माळकरआदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.