For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रथम गोळी चालवू, मग चर्चा करू

06:29 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रथम गोळी चालवू  मग चर्चा करू
Advertisement

डेन्मार्कचा अमेरिकेला इशारा : ग्रीनलँडवरुन तणाव वाढण्याची चिन्हे

Advertisement

वृत्तसंस्था/ कोपनहेगन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवर कब्जा करण्याच्या धमकीदरम्यान डेन्मार्कने कठोर भूमिका घेतली आहे. जर एखाद्या विदेशी शक्तीने आमच्या भूभागावर हल्ला केल्यास सैनिक कमांडरच्या आदेशाशिवाय त्वरित प्रत्युत्तरादाखल कारवाई करतील आणि गोळी चालवतील असे डेन्मार्कच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट पेले आहे.

Advertisement

आदेशाशिवाय हल्ला करण्याचा नियम 1952 मधील आहे. 1952 मध्ये डेन्मार्कने स्वत:च्या सैन्यासाठी एक नियम लागू केला होता, यानुसार विदेशी शक्तींनी देशावर हल्ला केल्यास सैनिकांना त्वरित लढावे लागते. याकरता त्यांना कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अनुमतीची आवश्यकता नसते. 1940 मध्ये जर्मनीने डेन्मार्कवर हल्ला केला होता, त्यावेळी कम्युनिकेशन सिस्टीम ठप्प पडली होती आणि काय करावे हेच सैनिकांना समजत नव्हते. या पार्श्वभूमीवर 1952 मध्ये डेन्मार्कने हा नियम लागू केला होता.

ग्रीनलँडमधील डेन्मार्कच्या सैन्याची शाखा जॉइंट आर्क्टिक कमांड कुठली कारवाई हल्ला मानावी हे ठरविणार आहे. ट्रम्प हे वारंवार ग्रीनलँडवर नियंत्रणाची मागणी करत असताना डेन्मार्कच्या संरक्षण मंत्रालयाने हे वक्तव्य पेले आहे.

संरक्षण करारामुळे मिळाली सूट

1951 च्या एका जुन्या संरक्षण कराराच्या अंतर्गत अमेरिकेला यापूर्वीच ग्रीनलँडमध्ये मोठ्या प्रमाणात सूट मिळाली आहे. हा करार अमेरिका आणि डेन्मार्कदरम्यान झाला होता.  ग्रीनलँड खरेदी करण्याच्या ट्रम्प यांच्या योजनेच्या विरोधात ग्रीनलँडमधील रहिवासी आहेत. डेन्मार्ककडे ग्रीनलँड विकण्याचा अधिकार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पूर्वीच्या काळात ग्रीनलँडशी निगडित निर्णय डेन्मार्कच घेत होता, परंतु आता स्थिती बदलली असून ग्रीनलँडच्या लोकांना स्वातंत्र्याबद्दल जनमत चाचणी करविण्याचा अधिकार आहे. मागील वर्षी एका सर्वेक्षणात 85 टक्के लोकांनी अमेरिकेच्या कब्जाला विरोध केला होता. ग्रीनलँडचे पंतप्रधान जेन्स-फ्रेडरिक नील्सन यांनी ‘ग्रीनलँड विकाऊ नसल्याचे’ वारंवार म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.