For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नव्या शत्रूचा करू सर्वनाश : नेतान्याहू

06:18 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
नव्या शत्रूचा करू सर्वनाश   नेतान्याहू
Advertisement

गाझासोबतचे युद्ध संपुष्टात आणणार इस्रायल

Advertisement

वृत्तसंस्था/ जेरूसलेम

इस्रायल आणि हमास यांच्यात दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे. आता युद्धासंबंधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी महत्त्वाचे वक्तव्य पेले आहे. इस्रायल गाझामध्ये हमासच्या विरोधातील लढाईचा वर्तमान टप्पा समाप्त करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी आता हिजबुल्ला विरोधात युद्ध छेडण्याचे संकेत दिले आहेत.

Advertisement

लेबनॉनमधील दहशतवादी गट हिजबुल्लाचा सामना करण्यासाठी इस्रायलच्या उत्तर सीमेवर अधिक सैनिक पाठविण्याची तयारी केली जात आहे. यामुळे इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  नव्या घडामोडींमुळे आता लेबनॉनपासून इराणपर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिजबुल्लाहशी लढण्यासाठी सैन्याला मोकळीक

सैन्य दक्षिण गाझा शहर राफामधील स्वत:चे हल्ले पूर्ण करण्याच्या समीप आहे. परंतु याचा अर्थ हमासच्या विरोधातील युद्ध संपले असा नाही. गाझामध्ये आता कमी सैनिकांची गरज भासणार आहे, यामुळे हिजबुल्लाशी लढण्यासाठी सैन्याला मोकळीक मिळणार असल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. काही तुकड्यांना उत्तर सीमेवर तैनात करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. आमच्यासाठी सर्वप्रथम हजारो विस्थापित इस्रायलींना घरी परतण्याची अनुमती देणे महत्त्वाचे असल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.

केवळ कागदोपत्री करार नको

समस्येवर तोडगा काढला जाऊ शकतो अशी अपेक्षा आहे, परंतु गरज भासल्यास समस्या वेगळ्याप्रकारे दूर करण्याची आम्ही शपथ घेतली आहे. आम्ही अनेक आघाड्यांवर लढू शकतो आणि असे करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. कुठलाही करार केवळ कागदोपत्री अस्तित्वात नसावा. याकरता हिजबुल्लाला सीमेपासून दूर राखणे आणि इस्रायलींना त्यांच्या घरी परतण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे उद्गार नेतान्याहू यांनी काढले आहेत.

Advertisement
Tags :

.