म्हादईची लढाई आम्ही नक्कीच जिंकू !
01:06 PM Nov 30, 2023 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
महाराष्ट्रही आम्हाला सहकार्य करेल; गोव्याचे मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत यांचे सावंतवाडीत प्रतिपादन
Advertisement
म्हादई प्रश्नावर आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत .म्हादईची लढाई आम्ही नक्की जिंकूच . असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत यांनी सावंतवाडी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले .मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत . म्हादई प्रश्नावर आमची लीगल टीम सक्रिय आहे . आणि लवकरच ही लढाई आम्ही सर्वोच्च न्यायालयात जिंकू . या लढाईत महाराष्ट्रही आम्हाला सहकार्य करेल असा आशावाद डॉ . प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला . सावंतवाडीतील माजी आमदार राजन तेली यांच्या संपर्क कार्यालयात ते आले होते . यावेळी भाजपच्या पदधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले .
Advertisement
Advertisement
Next Article