For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गरज पडल्यास पुन्हा हल्ला करू!

06:14 AM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
गरज पडल्यास पुन्हा हल्ला करू
Advertisement

अमेरिका-इराण चर्चेदरम्यान इस्रायलचा इशारा : सज्ज असल्याचाही दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करारावर चर्चा सुरू असतानाच इस्रायलने वेळप्रसंगी इराणवर पुन्हा हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. गरज पडल्यास इराणविरुद्ध लष्करी कारवाई पुन्हा सुरू करण्यासाठी लष्कर पूर्णपणे तयार असल्याचे  इस्रायली लष्करप्रमुख जनरल अयाल झमीर यांनी रविवारी नॉर्दर्न कमांडमध्ये झालेल्या सुरक्षा आढाव्यादरम्यान सांगितले. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेत काही प्रगती झाल्याचे वृत्त आलेले नाही.

Advertisement

अमेरिका आणि इराण शस्त्रसंधी वाढवण्यासाठी आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी चर्चा करत आहेत. तथापि, इराणच्या अणुकार्यक्रमावरून दोन्ही देशांमध्ये मतभेद कायम आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठकही रविवारी पार पडली. इस्रायली लष्कर इराणवर तात्काळ आणि मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई पुन्हा सुरू करण्यास तयार आहे. इराणची क्षमता शक्य तितकी कमकुवत करणे हे लष्कराचे ध्येय आहे. गरज भासेपर्यंत लष्कर पूर्ण सज्जता आणि लवचिकता कायम ठेवेल, असे इस्रायलने म्हटले आहे.

इस्रायली सैन्य लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्ध सातत्याने कारवाई करत आहे. त्यांच्या मते, सैन्य प्रत्येक स्तरावर हिजबुल्लाहला लक्ष्य करत आहे. एप्रिलमध्ये इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम जाहीर करण्यात आला होता. परंतु असे असूनही, इस्रायली सैन्याने अद्याप दक्षिण लेबनॉनमधून पूर्णपणे माघार घेतलेली नाही. ते हिजबुल्लाहच्या ठिकाणांना आणि लढवय्यांना लक्ष्य करून दररोज हल्ले करत आहेत, असे इस्रायलचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.