महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नोकरीत कायमस्वरुपी सामावून घ्या

10:42 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमच्यावरील अन्याय दूर करा : मनपा चालक-क्लिनरांचे उपायुक्तांना निवेदन

Advertisement

बेळगाव : गेल्या 25 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने महानगरपालिकेच्या वाहनांवर चालक म्हणून काम करत आहोत. आम्हाला कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेणे गरजेचे आहे. मात्र आमच्याकडे दुर्लक्ष करून नव्याने चालकांची नियुक्ती केली जात आहे. यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. तेव्हा आम्हाला तातडीने नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी जयभीम चालक व क्लिनर संघटनेतर्फे मनपा उपायुक्तांकडे निवेदनद्वारे केली आहे. दररोज पहाटे कामावर जायचे. कचरा गोळा करून तो तुरमुरी डेपोकडे पोहोचवायचा. याचबरोबर शहरातीलही कचरा गोळा करायचा. ही कामे आम्ही करत आहोत. गेली अनेक वर्षे हे काम करत आहे. असे असताना आम्हाला महापालिकेने कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याऐवजी इतर चालकांना संधी दिली जात आहे.

Advertisement

आमचे कंत्राटीपद्धतीने काम

महापालिकेतील वाहनांवर 60 चालक, 15 क्लिनर कंत्राटीपद्धतीने काम करत आहोत. आम्हाला कोणत्याच सोयी, सुविधा लागू केल्या जात नाहीत. त्यामुळे चुकून एखादा अपघात झाला तरी कुटुंबाला कोणतीच नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे कुटुंबही अडचणीत येते. तेव्हा विचार करून आम्हाला नोकरीत कायमस्वरुपी सामावून घ्या, असे निवेदनात म्हटले आहे. उपायुक्त उदयकुमार तळवार यांना निवेदन दिले.. यावेळी विशाल चलवादी, किरण हंचीमनी, गौस नदाफ, गजानन ताशिलदार, रशीद बस्सापुरे, श्रीधर चलवादी, रवी कोलकार, एस. एल. चव्हाण, जे. एम. बाळेकुंद्रीसह चालक उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article