Tilari Dam | तिलारी धरणाच्या काठावर जेवण झालं अन् काही मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; शनिवारी दुपारी नेमकं काय घडलं?
तिलारी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तीन तासांच्या शोधानंतर सापडला
हाजगोळी -हाजगोळी येथील चाळोबा देवालय पसिरातील तिलारी धरणाच्या पाण्यात शनिवारी बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. ओमकार नामदेव पाटील (वय २२ मूळचा हाजगोळी व सध्या गणेशपूर-बेळगाव) असे मृताचो नाव आहे. त्याचा मृतदेह शोध मोहिमेत तीन तासाच्या प्रयत्नांनंतर रात्री १२ बाजता मृतदेह हाती लागला. बेळगाव येथील एस.ई.आर.एफ रेक्कू टिमने पाण्यात कॅमेरे टाकून मृतदेह शोधून काढला. -
रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम बॅटऱ्या व लाईटच्या सहाय्याने करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ओमकार हा दुपारी आणखी दोन मित्रासह शनिवारी या ठिकाणी पार्टीसाठी आला होता. सोबत आणलेले जेवण झाल्यानंतर तो मित्रांसह पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने २० ते २५ फूट खोलीच्या ठिकाणी तो बुडाला.
घाबरलेल्या मित्रांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी त्याचाबहाजगोळी येथे याची माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी त्याचामृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. बेळगाव येथील रेस्क्यू टिमचे प्रमुख बसवराज हिरेमठ व अन्य टीमने रात्री ९ वाजल्यापासून तो बुडालेल्या ठिकाणी पाण्यात कॅमेरे टाकून मुतेदह शोध सुरू केला.
तीनतासाच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह हाती लागला. चंदगड पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह चंदगड ग्रामीण रूग्णालयाकडे शविच्छेदनासाठी पाठविला. रविवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर हाजगोळी येथे शोकाकुल बाताबरणा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, बहिल, बहिण, काका असा परिवार आहे. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.