For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

"आम्ही जाहीर माफी मागायला तयार आहोत" : रामदेव बाबा

03:35 PM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
 आम्ही जाहीर माफी मागायला तयार आहोत    रामदेव बाबा
Advertisement

योगगुरु रामदेवबाबा आणि पतंजली आयुर्वेद संस्थेचे संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी एक आठवड्याच्या आत जनतेची बिनशर्त माफी मागावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात हा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर आता रामदेवबाबांचं या प्रकरणी काय म्हणणं आहे ते समोर आलं आहे. मागच्या आठवड्यात १० एप्रिल रोजी जेव्हा खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती, तेव्हा खंडपीठाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची माफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज दोघांनीही जाहीर माफी मागण्यास तयार असल्याचे सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दाखल केलेल्या नोटिशीला उत्तर देताना त्यांनी ही बिनशर्त माफी मागितली होती. आता पुन्हा एकदा रामदेवबाबांचं म्हणणं समोर आलं आहे. सर्वोच्च न्यायलयाने रामदेवबाबाना विचारणा केली की तुम्हाला तुमचं काही म्हणणं मांडायचं आहे का? त्यावर त्यांचे वकील मुकुल रहतोगी म्हणाले की आम्ही आता कुठलीही फाईल दाखल करणार नाही. तसंच आम्ही (रामदेवबाबा) जाहीर माफी मागायला तयार आहोत. रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी जाहीर माफी मागावी आणि ती वृत्तपत्रात छापावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.