For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आम्ही निवडणुकीस सज्ज!

02:39 PM May 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
आम्ही निवडणुकीस सज्ज
Advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे प्रतिपादन

Advertisement

पणजी : आगामी गोवा विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होत असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो आणि आम्ही निवडणुकीस सज्ज आहोत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले. दैनिक तरुण भारतशी बोलताना दामू नाईक यांनी सांगितले की, भाजपने निवडणुकीसाठी तयारी केलेली आहे. निवडणूक कधीही येऊ द्या, आमची तयारी झालेली आहे. आमच्या सातत्याने बैठका चालू आहेत. तसेच अनेक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन देखील चालू आहे. आम्ही निवडणुकीमध्ये विविध टप्प्यांतून आमची प्रक्रिया पूर्ण करीत असतो. पहिला टप्पा असतो ए. दुसरा टप्पा असतो बी. तिसरा टप्पा असतो सी. आणि चौथा टप्पा म्हणजे डी. या चार प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक ती तयारी आमची झालेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणुका कधीही जाहीर केल्या तरी आम्ही निवडणुकीसाठी पक्षाची सारी यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.