चीनच्या सैन्याभ्यासाची भीती नाही : तैवान
अध्यक्षांनी घेतली तैवानच्या रक्षणाची शपथ
तैपेई : तैवानचे अध्यक्ष लाई चिंग-ते यांनी चिनी विस्तारवादाला खुले आव्हान देत बेटाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची शपथ घेतली आहे. चीनच्या वाढत्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षांसमोर तैवानी लोकांमध्ये स्वत:चे रक्षण करण्याचा संकल्प असल्याचे लाई यांनी नववर्षानिमित्त संबोधित करताना म्हटले आहे. चीनने तैवानला चहुबाजूने घेत सैन्याभ्यास केला आहे. या पार्श्वभूमीवर लाई यांनी ही टिप्पणी केली आहे. राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे दृढपणे रक्षण करणे, राष्ट्रीय सुरक्षा आणि पूर्ण समाजाच्या लवचिकतेला मजबूत करणे आणि एक प्रभावी लोकशाहीवादी संरक्षण व्यवस्था व्यापक स्वरुपात निर्माण करण्याचे धोरण अध्यक्ष म्हणून असल्याचे लाई यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच चीनने तैवानच्या चहुबाजूला रॉकेट लाँचर्स, विमाने आणि युद्धनौकांसह सैन्याभ्यास केला होता.