For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ड्रग्जच्या परिणामाला आम्ही सर्वच संयुक्तपणे जबाबदार

08:55 AM Dec 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
ड्रग्जच्या परिणामाला आम्ही सर्वच संयुक्तपणे जबाबदार
Advertisement

 भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे प्रतिपादन

Advertisement

पणजी/ खास प्रतिनिधी

अमलीपदार्थांचा गैरवापर रोखण्याचे कुणा एका संस्था अथवा खात्याचे काम नाही. हे पोलिस, न्यायालय अथवा कुटुंबापुरतेही सीमित नसून आम्ही सर्वजण याच्या परिणामाला संयुक्तपणे जबाबदार आहोत. या समस्येला गोव्याने खूप आधीपासून धाडसाने आणि खुल्या छातीने झेलले आणि यशस्वीपणे परतूनही लावले असल्याचे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केले.  गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणतर्फे पर्वरी येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘अमली पदार्थांचा गैरवापर, अमली पदार्थ: समाजासाठी एक धोका’ या विषयावरील 30 दिवसीय विशेष जनजागृती मोहिमेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

Advertisement

सरन्यायाधीश सूर्य कांत पुढे म्हणाले, की अमलीपदार्थांचा वापर हळुवारपणाने आणि अनेक कुटुंबात चाहूल न लागता सुऊ होतो. युवा पिढीला सुरवातीला त्याचे काही वाईट परिणाम दिसून येत नसले तरी ते कधी ब्रह्मराक्षसाचे रूप घेऊन समाज गिळंकृत करते, ते समजायला खूप उशीर होतो. आधी उत्सुकता, मग प्रयोग आणि नंतर या जाळ्यातून कधीही बाहेर पडू शकण्याचा अति आत्मविश्वास या पायऱ्या चढून झाल्यावर त्याचे कधी व्यसनात रूपांतर होते, ते कधीच समजू शकत नाही.

या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश न्या. चंद्रशेखर, प्रशासकीय न्यायधीश न्या. महेश सोनक, तसेच मुंबई, पाटणा, गुवाहाटी, गोवा राज्यातील अनेक न्यायधीश, वकील उपस्थित होते. न्या. महेश सोनक यांनी स्वागत केले, गोवा खंडपीठाचे  न्या. सारंग कोतवाल यांनी आभार मानले.

अमलीपदार्थांबाबत ‘झिरो टॉलरन्स’ : मुख्यमंत्री

अमली पदार्थांच्या गैरवापर ही आता खासगी कौटुंबिक समस्या न बनता  त्यामुळे एक गंभीर सामाजिक धोका निर्माण झाला आहे. ड्रग्सच्या अतिवापरामुळे मन आणि आत्मा कमकुवत बनतो. ड्रग्जमुळे ‘वचनांचे दु:खात’ रूपांतर होते आणि विशेषत: तऊणांचे जीवन उद्ध्वस्त करते. गोव्याची ओळख नैसर्गिक सौंदर्य, शांतता  आणि समृद्ध संस्कृतीसाठी जगभर झाली आहे. ड्रग्जच्या विळख्यामुळे गोव्याची ओळख नष्ट करायला सरकार देणार नाही. राज्यातील अमलीपदार्थांबाबत गोवा सरकारचे कठोर शून्य-सहिष्णुता धोरण आहे. त्यामुळे ड्रग्ज नेटवर्क नष्ट झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी  केले

- पर्वरीत विशेष जनजागृती मोहिमेचे उद्घाटन

?     अमली पदार्थांचा गैरवापर हा  समाजासाठी धोका

?     ड्रग्समुळे मन आणि आत्मा बनतो कमकुवत

?     झिरो टॉलरन्समुळे गोव्यातील ड्रग्स नेटवर्क झाले नष्ट

Advertisement
Tags :

.