For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वायनाड भूस्खलन ही राष्ट्रीय आपत्ती

07:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
वायनाड भूस्खलन ही राष्ट्रीय आपत्ती
Advertisement

राहुल गांधी : भूस्खलनग्रस्त भागाला दिली भेट : पीडितांना मदतीचे आश्वासन

Advertisement

वृत्तसंस्था /वायनाड

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वधेरा गुऊवारी वायनाडमध्ये पोहोचले. वायनाडचे माजी खासदार आणि काँग्रेसचे संभाव्य उमेदवार यांनी येथील भूस्खलनग्रस्त भागांना भेट दिली आणि पीडित कुटुंबांशी संवादही साधला. या कुटुंबांना पुरेशी मदत देण्याचे आश्वासन काँग्रेस नेत्यांनी दिले आहे. यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वायनाडमधील भूस्खलनाची घटना ही मोठी राष्ट्रीय आपत्ती असल्याचे स्पष्ट केले. तसेच येथील परिस्थती हृदय पिळवटून टाकणारी आणि डोळ्यात अश्रू अनावर करणारी असल्याचेही स्पष्ट केले.

Advertisement

राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी यांनी गुऊवारी दुपारी केरळमधील वायनाड जिह्यातील चुरमाला या भूस्खलनग्रस्त भागाला आणि मेप्पडी येथील ऊग्णालय आणि सामुदायिक आरोग्य केंद्राला भेट दिली. घटनास्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी फेसबुकवर “या आपत्ती आणि शोकांतिकेचे दृश्य पाहून मला खूप वाईट वाटले.” अशी पोस्ट केली. भूस्खलनाच्या आणि नैसर्गिक आपत्तींच्या वारंवार घडणाऱ्या घटना अत्यंत चिंताजनक आहेत. तसेच सर्वसमावेशक कृती आराखड्याची नितांत गरज असल्याचेही स्पष्ट केले. आम्ही या कठीण काळात वायनाडच्या लोकांसोबत उभे आहोत. आम्ही मदत, बचाव आणि पुनर्वसन प्रयत्नांचे बारकाईने निरीक्षण करत आहोत आणि सर्व आवश्यक सहाय्य पुरवले जाईल याची खात्री करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी डॉ. मूपेना मेडिकल कॉलेज आणि मेपाडी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रालाही भेट दिली. याठिकाणी त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. पक्षाचे सरचिटणीस आणि अलप्पुझाचे खासदार के. सी. वेणुगोपाल आणि इतर अनेक काँग्रेस नेतेही या दोघांसोबत होते. घटनास्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी मदत शिबिरांनाही भेट देत एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला. राहुल-प्रियंका यांच्या या भेटीचा संबंध वायनाड पोटनिवडणुकीशीही जोडला जात आहे.

Advertisement
Tags :

.