महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वायनाड भूस्खलन ! मृतांची संख्या 80 वर, प्रतिकूल हवामानामुळे बचाव कार्याला फटका

04:47 PM Jul 30, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळील डोंगराळ भागात मंगळवारी सकाळी भूस्खलन होऊन किमान ८४ जण ठार झाले असून अनेक जण बेपत्ता झाले असल्याची बातमी समोर येत आहे. या आपत्तीमुळे प्रभावित भागात सुमारे 250 लोक अडकले असून खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. या बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासन कार्यरत आहे.

Advertisement

बचाव कार्यात मदत करण्यासाठी सैन्याने संरक्षण सुरक्षा दलाचे 200 सैनिक आणि वैद्यकीय पथक तैनात केले आहे. त्याशिवाय, सुलूर येथील हवाई दल केंद्रातून दोन हेलिकॉप्टर मदतीसाठी करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या उच्च अधिकाऱ्यांशी वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागातील परिस्थितीबाबत चर्चा केली.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला. त्यांनी पीडीतांना तातडीची 10000 रूपयांची मदत देण्याची घोषणा केली. प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून 2 लाख, रु. जखमींना 50,000 रु जाहीर केले आहेत.

दरम्यान, विरोधी पक्षनेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी पिडीत कुटुंबियांविषयी मनापासून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लोअर हाऊसला संबोधित करताना केंद्र सरकारला बचाव आणि वैद्यकीय सेवेसाठी सर्व आवश्यक सहाय्य प्रदान करण्यासाठी आणि मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने भरपाई जाहीर करण्यासाठी तसेच नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ सुचविण्याची विनंती केली.

केरळ राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही वेणू यांनी 70 हून अधिक मृतदेह सापडले असून ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. रिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले.

केरळमधील बचाव पथकांना बाधित भागात पोहोचण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे, प्रामुख्याने दुर्गम प्रदेशांमुळे निर्माण झालेल्या घटनेमुळे मदत पुरवण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला बचाव कार्य सुरू करण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज असल्याचेही डॉ. वेणू यांनी स्पष्ट केले.

आयएमडीने जारी केलेल्या रेड अलर्टमुळे, हेलिकॉप्टर उड्डाण करू शकत नाहीत, त्यामुळे हवाई बचाव कार्यात विलंब होत आहे.
एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट एस शंकर पांडियन यांनी, भूस्खलनाचे व्यवस्थापन करण्यासाठी वायनाड आणि कोझिकोडमध्ये अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. अंतर्गत भागात पोहोचण्यात आव्हाने असूनही, एनडीआरएफचे पथक सक्रियपणे बचाव कार्यात गुंतली असल्याचं म्हटलं आहे.

Advertisement
Tags :
KeralaWayanad landslide
Next Article