For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Wayanad Land Sliding अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल वायनाडमध्ये भूस्लखन...२ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी

07:03 PM Jul 07, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
wayanad land sliding अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल वायनाडमध्ये भूस्लखन   २ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी
Advertisement

केरळमधील वायनाड येथील भूस्खलनाचा अंगावर शहारे आणणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये डोंगराच्या पायथ्याशी असलेला एक ट्रक डोंगरावरुन वाहून आलेल्या दगड मातीमुळे काही अंतरावर घसरल्याचे दिसते तर काही नागरिक दूर पळून जाताना रस्त्यावरच पडल्याचे दिसत आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार केरळच्या वायनाड जिल्ह्यात झालेल्या मोठ्या भूस्खलनात किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत असा प्राथमिक अंदाज आहे. ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरू असताना, या घटनेची थरारक दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

कोझिकोड आणि वायनाड बोगद्याचे काम

Advertisement

व्हिडिओमध्ये, कोझिकोड आणि वायनाड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सुरू असलेल्या बोगद्याचे काम सुरु आहे. याच प्रकल्पाच्या कल्लाडी येथील मीनाक्षी पुलाजवळ साचलेला चिखलाचा मोठा ढिगारा पावसामुळे अचानक खाली कोसळताना दिसत आहे. यामुळे झाडे उन्मळून पडत असून, बांधकाम स्थळावर लावलेले धातूचे आणि कापडी अडथळे उडून जात आहेत. व्हिडिओमध्ये भूस्खलनाच्या तडाख्याने एक ट्रक आणि एक बसदेखील वाहून जाताना दिसत आहेत. 

बचावकार्य सुरु

बचाव कार्यासाठी पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) जवान, तसेच केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (केएसडीएमए) अधिकारी तैनात करण्यात आले आहेत .

मिळालेल्या वृत्तानुसार, भूस्खलनामुळे किमान सात जण बेपत्ता झाल्याची पुष्टी झाली आहे, तर इतर सात जणांना वाचवण्यात आले असून ते जखमी आहेत. आतापर्यंत मृतांची संख्या दोन झाली आहे.

"दोन मृत्यूंची पुष्टी झाली आहे. रस्ता मोकळा झाल्यानंतर बचावकार्य पूर्ण केले जाईल. केरळबाहेरील मजुरांवर उपचार करण्यासाठी आम्ही वायनाडमधील सर्व रुग्णालयांना निर्देश दिले आहेत. प्राथमिक अहवालानुसार, या घटनेत कोणताही स्थानिक नागरिक बाधित झालेला नाही," असे आरोग्य मंत्री के. मुरलीधरन म्हणाले.

Advertisement
Tags :

.