महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वायनाड : प्रियांकांविरोधात भाजपच्या नाव्या हरिदास

06:55 AM Oct 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केरळमधील वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याविरोधात पक्षाने नाव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे वायनाड पोटनिवडणुकीतील लढत रंजक होण्याची अपेक्षा आहे. भाजपने वायनाडसोबतच आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने वायनाड पोटनिवडणुकीची घोषणा केल्यानंतर लगेचच काँग्रेसने केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियांका गांधी यांना उमेदवारी जाहीर केली होती. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी रायबरेलीमधून आपले सदस्यत्व कायम ठेवले आहे. तर, वायनाडमधून माघार घेताना आपली बहीण प्रियांका यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article