महादुर्बिणीभोवती प्रश्नांच्या लहरी...
जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप हा संशोधन कार्यातील ‘माईलस्टोन’
‘जीएमआरटी’ अन्यत्र हलविण्यासाठी हालचाली गतिमान झाल्याची चर्चा
खगोल क्षेत्रातील महत्त्वाची अशी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) संस्था पुणे जिल्ह्यातील नारायणगाव, खोडद येथे आहे. देशाच्या खगोल विश्वात जीएमआरटीचे योगदान मोठे आहे. खगोलशास्त्राचा थेट मानवी जीवनावर परिणाम होत नसला, तरी यातील संशोधन मानव जातीसाठी महत्त्वपूर्ण ठरते. शहरापासून दूर अशा डोंगराळ भागात ही संस्था तसेच 30 मोठ्या दुर्बिणी येथे वसलेल्या आहेत. मात्र, विकासाची गंगा येथे पोहोचल्याने हीच महत्त्वाची संस्था आता अडथळा वाटू लागली आहे. ती हलविण्याची मागणी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत केल्याने विज्ञान की विकास, असा प्रश्न आता पुढे आला आहे.
‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’च्या (जीएमआरटी) स्थापनेत प्रा. गोविंद स्वऊप यांचे मोठे योगदान आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पीएचडी पूर्ण करीत खगोलविश्वात त्यांनी संशोधनास सुऊवात केली. डॉ. होमी भाभा यांच्या निमंत्रणावरून त्यांनी मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत प्रवेश केला. येथे रेडिओ खगोलशास्त्राचा अभ्यासगटाची सुऊवात झाली. यासाठी कल्याण येथे देशातील पहिला रेडिओ टेलिस्कोप उभारत त्यांनी सूर्यावर संशोधन करण्यास सुऊवात केली. यानंतर तामिळनाडूतील उटी येथे देशातील-जगातील सर्वात मोठी पहिली स्वदेशी रेडिओ टेलिस्कोप उभारण्यात आली. यामध्ये स्वऊप यांचे मोठे योगदान आहे. याद्वारे पलसार, सुपरनोव्हा आदींची निरीक्षणे घेण्यात आली. या टेलिस्कोपच्या सहाय्याने रेडिओस्त्राsतांवर अभ्यास करण्यात आला व त्याला यशही मिळाले. यानंतर आणखी मोठ्या रेडिओ टेलिस्कोपच्या निर्मितीचा विचार सुरू झाला.
‘जीएमआरटी’चा प्रस्ताव 1985 साली केंद्र सरकारला सादर करण्यात आला. याच्या उभारणीसाठी देशभर जागा शोधण्यात आल्या. याच्या मंजुरीनंतर 45 मीटर व्यासाच्या 30 अँटेना नारायणगावच्या 25 किमी परिसरात उभारण्याचा मानस ठरला. याद्वारे यातून येणाऱ्या रेडिओलहरींचा अभ्यास अँटेना करणार होत्या. ऑप्टीकल फायबरने या अँटेना एकमेकांशी जोडल्या जाणार होत्या. त्यामुळे एकाचवेळी या 30 अँटेना केंद्रीत करून त्यांचा सर्वांगीण अभ्यास करता येणार होता. मानवी हस्तक्षेपासून दूर जेथे मानवी प्रकल्पापासून निघणाऱ्या रेडिओ लहरी अडथळा ठरणार नाहीत, अशी नारायणगावजवळील खोडद येथील जागा निश्चित करण्यात आली.
2002 मध्ये विस्तीर्ण अशा परिसरात याची उभारणी झाल्यानंतर जीएमआरटी जगभरातील संशोधकांसाठी खुली करण्यात आली. 50, 150, 233, ते 1420 अशा अनेक मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीवर अवकाशातील विविध घडामोडी टिपण्यात आल्या. सौरवादळे, सूर्य, सौरलहरी, तारे, दीर्घिका, आकाशगंगा, गुरुत्वीय लहरी यांचा जवळून अभ्यास करण्यात येऊ लागला. सद्यस्थितीला देश विदेशातील अनेक शास्त्रज्ञ, संशोधक जीएमआरटीच्या अँटेनाद्वारे आपले संशोधन पार पाडीत आहेत.
नवीन ताऱ्यांचा शोध, सर्वात जुन्या रेडिओ दीर्घिकेचा शोध, जीएमआरटीचा वापर करून शोधून काढण्यात आल्या आहेत. विश्वात गुऊत्त्वीय लहरींचा गोंगाट अस्तित्त्वात असल्याच्या शोधत जीएमआरटीचे योगदान आहे. एकूणच एक अज्ञात विश्वाचा शास्त्रीयदृष्ट्या शोध, संशोधन करण्याचे काम जीएमआरटीद्वारे केले जात आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या मानाचा आयईईई माईलस्टोनचे मानांकन ‘जीएमआरटी’ला मिळाले आहे.
2019 साली या संस्थेचे अद्ययावतीकरण करण्यात आले. यामुळे संशोधन कार्य अधिक सोपे झाले. संस्थेच्या संशोधनात अडथळा येऊ नये, यासाठी शहरापसून दूर ही संस्था वसविण्यात आली. आसपासच्या भागात औद्यागिक विकास होताना, त्यातून येणाऱ्या रेडिओ लहरींचा संशोधनाला अडथळा न होण्याची दक्षता संस्थेला घ्यावी लागते. तशा उपाययोजनाही सुचविण्यात येतात. या भागातील मोबाईल फ्रीक्वेन्सीही संशोधनाला अडथळा न ठरणारी आहे.
काय आहे मागणी
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे. 232 किमी मार्गाचा पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग चाकण, नारायणगाव, राजगुऊनगर, खेड, संगमनेर, नाशिक असा आहे. यामुळे पुणे-नाशिक अंतर दीड तासाने कमी होणार आहे. जीएमआरटीच्या प्रकल्पामधून हा मार्ग प्रस्तावित आहे. प्रस्तावित नारायणगाव रेल्वेस्टेशन संस्थेपासून 2 किमीच्या परिसरात आहे. रेल्वेच्या ओव्हरहेड विजेच्या तारांपासून निघणाऱ्या रेडिओ गोंगाटामुळे जीएमआरटीच्या अँटेनाद्वारे नोंदी घेताना अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे संशोधनात बाधा येऊ शकते. म्हणूनच यावर जीएमआरटीने काही उपाय/ पर्याय सुचविले आहेत.
हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव आल्यानंतर याला अणुऊर्जा विभागाने रेल्वे मंत्रालयाकडे आक्षेप नोंदविला. यावर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार जीएमआरटीच्या शास्त्रज्ञांनी, अँटेनाच्या कोणत्याही डिशपासून 15 किमी अंतरावरून रेल्वेमार्ग जावा, संस्थेच्या परिसरापासून किमान 30 किमीचा मार्ग बंदिस्त अथवा रेडिओ उत्सर्जनरोधित असावा, रेल्वेची यंत्रणा रेडिओ लहरींना अडथळा ठरणारी नसावी, असे पर्याय दिले आहेत.
खासदार कोल्हे यांची मागणी, अन् पुढे...
30 महाकाय दुर्बिणीद्वारे खगोल विश्वाचे गूढ उलगडण्याचे काम जीएमआरटी येथे शास्त्रज्ञ करीत असतात. या संस्थेला वेगळे वलय आहे. मात्र, ही संस्था विकासात अडथळा ठरत असून, याचे स्थलांतर करण्याची मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी एका पत्राद्वारे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्याकडे केली आहे. 19 डिसेंबरला लिहिलेल्या पत्रात कोल्हे म्हणतात, ‘माझ्या मतदारसंघातील जीएमआरटी महत्त्वाची संस्था आहे. पण यामुळे गेली तीन दशके पायाभूत तसेच औद्योगिक विकास रखडला आहे. औद्योगिक परवानग्या उशिरा मिळणे, मोबाईल नेटवर्क नसणे या समस्या तीव्र होत आहेत. यामुळे प्रस्तावित पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पही रेंगाळला आहे. जीएमआरटीच्या शास्त्रज्ञांनी यासाठी काही तांत्रिक उपाय सुचवावा अथवा ही संस्था हलविण्यात यावी.’
सुधारित डीपीआर करणार
याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑक्टोबरमध्ये स्पष्टीकरण दिले आहे. जीएमआरटी लगतच्या 10 किमी क्षेत्रात रेल्वेचे विद्युतीकरण करणे, टाळता येऊ शकते. यासाठी सुधरित अूaग्त् झ्rदराम्t Rाज्दू (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे.
पर्यायांचा विचार
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनीदेखील जीएमआरटीचे महत्त्व विषद करीत याला पर्याय स्वीकारण्याचे सांगितले आहे. आयुकाचे माजी संचालक आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ नरेंद्र दधीच यांनी जीएमआरटीने रेल्वेमार्गासाठी दिलेला दुसरा पर्याय स्वीकारण्यास सांगितले आहे. यातून विविध पर्यायांचा विचार सुरू असल्याचे दिसून येते.
शास्त्रज्ञांचा विरोध
संस्थेच्या उभारणीसाठी खूप कष्ट घेण्यात आले आहेत. यातून अनेक महत्त्वपूर्ण संशोधनेही बाहेर पडली आहेत. देश तसेच विदेशातील अभ्यासक येथे येतात. अशा या संस्थेचे योगदान दुर्लक्षित करून ती हलविण्याची मागणी केल्याने शास्त्रज्ञांमध्ये नाराजी पसरली आहे.
विकासाची प्रक्रिया ही निरंतर असते. काळानुरूप बदल करावे लागतात. ते क्रमप्राप्तच असतात. मात्र, परिवर्तनाच्या या प्रक्रियेत पर्यावरणाचा किंवा वेगवेगळ्या संवेदनशील संस्थांचा विचार करावा लागतो. मागच्या काही वर्षांमध्ये विकास की पर्यावरण, हा प्रश्न सातत्याने समोर येताना दिसतो. नारायणगाव पट्ट्यातही विकास की खोडद महादुर्बिण असा प्रश्न उभा ठाकला आहे. या मार्गावर नवीन रेल्वेमार्ग व्हावा, ही येथील जनतेची जुनी इच्छा आहे. मागच्या अनेक वर्षांपासून आश्वासनांशिवाय येथील लोकांच्या हातात काही पडलेले नाही. त्यामुळे त्यांचे रेल्वेचे स्वप्न अद्याप अधुरेच आहे. या पार्श्वभूमीवर शिरूरचे स्थानिक खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हा विषय आपल्या रडारवर घेतला आहे. डॉ. कोल्हे यांचे सर्वपक्षीयांशी चांगले संबंध आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही त्यांचा अनेकदा संवाद झाला आहे. आता कोल्हे यांनी जोर लावल्याने येथील अनेक मंडळींच्या आशा पल्लवित झालेल्या दिसतात. असे असले, तरी शास्त्रज्ञ तसेच अन्य काही मंडळींचा याला विरोध दिसतो. ‘जीएमआरटी’चे महत्त्व वेगळे आहे. त्यामुळे त्यावर गंडांतर येता कामा नये, असे या मंडळींना वाटते. हे बघता या प्रश्नांचा गुंता सोडविणे, ही नक्कीच कठीण बाब असेल.
- अर्चना माने-भारती, पुणे