For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Bamnoli | बामणोलीत संतापाचा लाट! ६ महिन्यांचे काम २ वर्षे उलटली तरी अपूर्णच; आमदार गाडगीळ यांचा निधी पडून

02:40 PM Mar 22, 2026 IST | NEETA POTDAR
bamnoli   बामणोलीत संतापाचा लाट  ६ महिन्यांचे काम २ वर्षे उलटली तरी अपूर्णच  आमदार गाडगीळ यांचा निधी पडून
Advertisement

                बामणोलीतील रस्त्याचे काम दोन वर्षे अपूर्ण, ग्रामस्थ नाराज

Advertisement

कुपवाड -बामणोली येथे कोंडके मळ्यातील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले प्रभाग क्रमांक तीनमधील रस्त्याचे काम दोन वर्षे उलटले तरी अपूर्ण अवस्थेतच आहे. केवळ सहा महिन्यांची मुदत असताना काम पूर्ण न झाल्याने जबाबदार असणारे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारा विरोधात बामणोलीचे सरपंच, पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आमदार गाडगीळ यांच्या विशेष योजना २५१५ अंतर्गत मौजे बामणोली हद्दीतील वॉर्ड क्रमांक तीनमधील भरत होवाळे घर ते अनिल कांबळे घर रस्त्याचे काम मंजूर करणेत आले होते. या कामासाठी १० लाख ५२ हजार ७२१ रुपये इतका निधी मंजूर केला होता. रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, सध्या दोन वर्षे कालावधी पूर्ण झाला, तरी हे काम शेवटच्या टप्यात येऊन रखडले आहे. बांधकाम विभाग संबंधिताला पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे. खडीकरण व डांबरीकरण जरी झाले असले तरी बाजू पट्टी आणि सीलकोट काम बाकी आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.