For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाणी...जल....आप...

06:29 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाणी   जल    आप
Advertisement

पृथ्वीच्या पंचतत्वांची माहिती घेताना आपण पृथ्वीचं स्थान पाहिलं. आकाशाची माहिती घेतली. ती पृथ्वी ज्या आवरणात आहे त्याची माहिती म्हणजेच आप, जल त्याचं वर्णन समर्थांनी आपल्या सोळाव्या अध्यायात खूप छान केले आहे.

Advertisement

‘पृथ्वीचा आधार आवरणोदक । सप्तसिंधूंचे सिंधोदक । नाना मेघींचे मेघोदक । भूमंडळी चालले ।

याच पाण्याचा वेदांनी आपल्या भाषेत गौरव केलाय. वेद आप ज्योती रसो अमृतम तजलान.. म्हणजे आधी तत्व यातून जन्माला आले असं हे पाणी निराचं शिरात रूपांतर म्हणजे हे विश्व निर्माण केले. ज्याला आम्ही निरक्षर विवेक म्हणतो. अशी बुद्धी ज्याच्यात असते तो हंस पक्षी आणि अशा पक्षाची बुद्धी ज्याच्यात असते त्याला परमहंस असं म्हणतो. विष्णू क्षीरसागरात निद्रिस्त असतात. म्हणजेच ज्या विश्वाच्या अणुरेणूत विष्णू तत्व आहे ते हे सगळं स्वरूप गीता ह्याला ईश्वर हा सर्व भूताना रू देशो तीष्ठती असं गौरविते. पुराण काळामध्ये शंकराच्या जटेतून गंगेचा प्रवाह बाहेर पडला अशा कथा आपण वाचल्याच आहेत. गंगेला कमला म्हणजेच पाण्यात जन्मलेली लक्ष्मी जी कमळात असते आणि लक्ष्मीच्या जवळ ऐरावत म्हणून या पाण्याला इरा म्हणण्याची पद्धत आहे.

Advertisement

खरंतर स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तीनही लोकात एकच नदी वाहते असं मानलं जातं. या पृथ्वीवरती असलेले सगळी गृहमंडळे यांना नक्षत्रगंगा असंच म्हटलं जातं. याचेही वर्णन समर्थांनी आपल्या शब्दात खूप छान केले आहे.

‘स्वर्ग मृत्यू पातळी । एक नदी तीन तळी । मेघोदक अंतराळी वृष्टी करी. ।

पृथ्वीवरती आत बाहेर सर्वत्र पाणीच आहे, हे आपल्याला पुन्हा समर्थांच्या भाषेतूनच कळते. पृथ्वीतळी पाणी भरले. पृथ्वीमध्ये पाणी खेळे, पृथ्वीवरती प्रकटले उदंड पाणी म्हणजे समुद्रावरती, वेगवेगळ्या नद्या, तलाव, डबकी यामध्येही पाणीच दिसते आणि पृथ्वीवरून आकाशात, आकाशातून जी मेघवर्षा होते. त्यातून पाणी मिळते. म्हणजे सर्वत्र पाणी आहे, याचीच प्रचिती येते. खरं तर आपला देहदेखील 70 टक्के पाण्याने व्यापलेला आहेच. ते नसलं की आपला जीव माशासारखा तडफडायला लागतो. असा हा पाऊस बघायला अनेक देशोदेशीचे लोक आपल्या भारतात येतात. मुख्य करून वाळवंटातील लोक. पाऊस कसा पडतो? कसा दिसतो? काय वाटतं? अशा या पाण्याचा महिमा मोठा. सर्व जीवजंतू यांचा जन्म समुद्रमंथनाच्या वेळी पाण्यातूनच झाला. अगदी लक्ष्मीचं वैभवसुद्धा या पाण्यातूनच. पर्जन्याची देवता इंद्र. इंद्र दरबारात अप्सरा नाचतात असं आपण ऐकलंय. त्या सुंदर असतात, तरुण असतात आणि तपोभंग करणाऱ्या असतात. अप्सरा या शब्दांचा आपण विग्रह केला तर लक्षात येतं आप-सरा म्हणजे पाण्यातून जाणारी विद्युत शक्ती. खेड्या पाड्यांमध्ये नदी किंवा पाण्यामध्ये एखादा खडक असेल तर त्या खडकाला अप्सरेचा खडक म्हणतात. सध्या अशा अप्सरा विद्युत रूपाने आपल्याला अनेक द्रुकश्राव्य माध्यमातून बघायला मिळतात. पाणी आणि अप्सरा या दोन्हीही अधपतनासाठीच प्रसिद्ध आहेत. तरीदेखील आपोज्योती रसो अमृतम अशी त्याची रूपं आहेत. आप हे प्राण तत्व आहे. यातून जीवजंतू निर्माण होतात. आप हे रसतत्व आहे, जे फळांच्या रसातून आपल्याला अनुभवायला येतात किंवा चाखता येतात. म्हणूनच आप म्हणजेच पाण्याला आरोग्याचा डॉक्टर असे म्हटले जाते. योगशास्त्रामध्ये जलचिकित्सा म्हणूनच फार महत्त्वाची मानली जाते. माणसाचे आणि निसर्गाचे आरोग्य फक्त ह्या पाण्यामुळेच उत्तम राहतं. आपण कुठेही गेलो तरी आपल्याला पाणी दिसल्यानंतर जो काही मनापासून आनंद होतो तो याचमुळे.

Advertisement
Tags :

.