सावंतवाडीतील ''या'' भागात दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार
न .पालिका मुख्याधिकाऱ्यांची माहिती
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील अनेक भागात पालिकेतर्फे होणारा पाणीपुरवठा सध्या बंद आहे. नरेंद्र डोंगरावर पाईप लाईनवर दरड कोसळल्याने हा पाणीपुरवठा बंद आहे. रविवार पासून हा पुरवठा बंद आहे. पालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, मंगळवार पर्यंत या प्रयत्नांना यश न आल्याने अखेर पालिकेने आणखी दोन ते तीन दिवस पाईपलाईनची दुरुस्ती होईपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पत्र प्रसिद्ध दिले आहे. मुख्याधिकारी यांनी हे पत्र दिले आहे . सावंतवाडी नरेंद्र डोंगर भागातील श्री. सलाम तहसिलदार यांचे घराजवळ पाण्याच्या पाईप लाईनवर दरड कोसळलेली असून पाण्याची पाईप लाईन फुटलेली आहे. पाण्याच्या पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. तरी सालईवाडा करोल दुकान जवळील कॉलनी, सालईवाडा टोपले घर ते मुंज, पेडणेकर घरापर्यंत, पेडणेकर घर ते मोरडोंगरी, गणेश नगर, मराठा समाज वसतीगृहाजवळील कॉलनी व सर्वोदयनगर येथील पाणीपुरवठा पुढील २ ते ३ दिवस पाण्याच्या पाईप लाईनची दुरुस्ती होईपर्यंत बंद राहणार आहे तरी सदर परिसरातील नागरिकांनी कृपया नगरपरिषदेस सहकार्य करावी ही विनंती.