Kolhapur : कोल्हापुरात सी, डी वॉर्डचा पाणीपुरवठा आज बंद !
मंगळवारी कमी दाबाने सुरळीत पुरवठा
कोल्हापूर : शहरातील सी व डी वॉर्डचा पाणीपुरवठा सोमवारी २७ रोजी बंद राहणार आहे. धोत्री गल्ली येथील १६ इंची पाईपलाईनला लागलेली गळती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून काढली जाणार आहे. आहे. त्यामुळे सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार असून मंगळवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
कोकणेमठ पाण्याच्या टाकीला जोडलेल्या १६ इंची पाईपलाईनवर धोत्री गल्ली येथली धोत्री मटण शॉप येथे गळती लागली आहे. गळती काढण्याचे काम सोमवारी केले जाणार आहे. त्यामुळे या पाईपलाईनवर अवलंबून भागांमध्ये दैनंदिन पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
सी व डी वॉर्डमधील बुरुड गल्ली, विठ्ठल मंदिर, अवधूत गल्ली, डंगरी गल्ली, ज्ञानेश्वर मंडप, हळदकर हॉल, टेबलाई मरगाई गल्ली, जुने विवेकानंद कॉलेज, जुना बुधवार पेठ, ब्रम्हपुरी, तोरस्कर चौक, राजेबागेस्वार, निलेश हॉटेल, परिट गल्ली, नष्टे गल्ली, शनिवार पेठ, भगतसिंग चौक, नरसोबा सेवा मंडळ, धडंगी बोळ पापाची तिकटी, माजगांवकर पॅसेज, कलकुटकी गल्ली, गंबडी मोहल्ला, कैसापूर पेठ, सी.पी.आर. रुग्णालय परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.