For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : कोल्हापुरात आज, उद्या पाणीपुरवठा बंद !

02:40 PM Oct 13, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur   कोल्हापुरात आज  उद्या पाणीपुरवठा बंद
Advertisement

                      दुरुस्ती कामांमुळे कोल्हापूरकरांना पाण्याची टंचाई

Advertisement

कोल्हापूर :  काळम्मावाडी योजनेचा चौथा पंप दुरुस्ती व नियमित देखभाल दुरुस्तीचे करण्यात येणार आहे. यामुळे सोमवारी व मंगळवारी शहरात पाणीपुरवठा होणार नाही. या कालावधीमध्ये साळोखेनगर ११०० मिमी मुख्य वितरण नलिकेवरील व्हॉल्व्ड बसविण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे.

त्यामुळे या योजनेवर अवलंबून असणाऱ्या कोल्हापूर शहर व संलग्नित उपनगरे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. बुधवारी होणारा पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. त्याचप्रमाणे बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या सी, डी वॉर्ड व शिंगणापूर येथून कसबा बावडा फिल्टरकडून कसबा बावडा, ताराबाई पार्क व कावळा नाका परिसरातील नागरिकांचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

Advertisement

पाणीपुरवठा होणार नसलेला परिसर

यामध्ये संपूर्ण ए, बी वॉर्डातील पुईखडी, कलिकतेनगर, सुलोचना पार्क, इंगवले कॉलनी, नाना पाटीलनगर, जिवबा नाना, बापूरामनगर, साळोखेनगर, राजीव गांधी वसाहत, कात्यायनी कॉम्पलेक्स, तपोवन, देवकर पाणंद, मोरे मानेनगर, संभाजीनगर स्टैंड, नाळे कॉलनी, रामानंदनगर, बालाजी पार्क, शाहू कॉलनी, सासणे कॉलनी, रायगड कॉलनी, जरगनगर, सुभाषनगर, शेंडापार्क, आर. के. नगर, भारती विद्यापीठ, म्हाडा कॉलनी, संभाजीनगर, गंजीमाळ, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, पोतणीस बोळ, मंगेशकर नगर, बेलबाग,

महालक्ष्मीनगर, सरनाईक वसाहत, तिकोणे गरज, नेहरूनगर, वाय. पी. पोवार नगर, जवाहर नगर, संपूर्ण राजारामपुरी, शाहू मिल परिसर, शाहू मिल कॉलनी, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीनपार्क, शांतीनिकेतन, रेव्हेन्यु कॉलनी, अरूणोदय, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कूल, सम्राटनगर,प्रतिभानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, नवश्या मारूती चौक, दत्त गल्ली, यादवनगर, कामगार चाळ, पंत मंदिर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृतीनगर, पायमल वसाहत, अंबाई डीफेन्स, राजाराम रायफल, काटकर माळ, साईक्स एक्सटेंशन व शाहूपुरी १ ली ते ४ थी गल्ली आदी भागामध्ये दैनंदिन पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

या भागातील नागरिकांना उपलब्ध टँकरव्दारे पिण्याचा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. तरी या भागातील नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने केले आहे.

Advertisement
Tags :

.