तिसवाडी, फोंडा तालुक्यात 13, 14 मे रोजी पाणीपुरवठा बंद
01:08 PM May 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : पणजी तसेच तिसवाडी तालुक्याला वितरित करणाऱ्या 700 मि. मी. रुंदीच्या तसेच 600 मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीची तातडीची दुरुस्ती हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या 13 व 14 मे रोजी संपूर्ण तिसवाडी तालुका तसेच गोमेकॉ, संरक्षण विभाग आणि केरी फोंडा, सावईवेरे, मडकई या फोंडा तालुक्यातील भागाला पाणीपुरवठा होणार नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याने मर्यादित पाणीपुरवठा असे म्हटले असले तरी पाणीपुरवठा होण्याची शक्यता कमीच आहे. जनतेने याची दखल घ्यावी.
Advertisement
Advertisement