महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निम्म्या शहरात आज पाणीपुरवठा बंद

11:17 AM Jan 20, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

महावितरणच्या वतीने बालिंगा सबस्टेशनच्या मासिक देखभाल दुरुस्तीचे काम हाती
ए, बी आणि ई वॉर्डमधील काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
कोल्हापूर
बालिंगा उपसा केंद्र येथे आज (सोमवारी) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने सबस्टेशनच्या 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीच्या मासिक देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे बालिंगा उपसा केंद्रातून पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे शहरातील ए, बी आणी ई वॉर्ड मधील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारी या भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
बालिंगा सब स्टेशनच्या 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीच्या मासिक देखभाल दुरुस्तीचे कामकाज महावितरणच्या वतीने आज हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे बालिंगा उपसा केंद्राचा विद्युत पुरवठा सोमवारी बंद रहाणार आहे. यामुळे बालिंगा उपसा केंद्रातून उपसा होऊ शकणार नसल्याने दैनंदिन पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
बालिंगा उपसा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या ए, बी, वॉर्ड त्यास संलग्नीत उपनगरे, ग्रामीण भाग व शहरी अंतर्गत येणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजीपेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही भाग. संपूर्ण सी डी वॉर्ड, दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वरपेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदुचौक, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, उमा टॉकीज,महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब व त्यास सलग्नित ग्रामिण भाग व उपनगरे तसेच ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोलपंप परिसर, शाहूपुरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी भागात भागामध्ये दैनंदिन होणारा पाणी पुरवठा बंद राहील. तरी सोमवारी नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article