For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : कोल्हापुरात उद्या पाणी पुरवठा बंद ; मंगळवारीही अपुरा पुरवठा

12:40 PM Nov 23, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोल्हापुरात उद्या पाणी पुरवठा बंद    मंगळवारीही अपुरा पुरवठा
Advertisement

                    मंगळवारीही अपुरा आणि कमी दाबाने होणार पुरवठा

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील ए, बी, सी, डी वॉर्डसह ई वॉर्डमधील काही भागास  सोमवार, दि. २४ रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर मंगळवार, २५ रोजी अपुरा आणि कमी दाबाने पुरवठा होणार आहे. या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून सोमबार २४ रोजी बालिंगा सबस्टेशनकडील उच्चदाब बाहिनीच्या कामासाठी बिद्युत पुरवठा कामकाज पूर्ण होईपर्यत बंद राहणार आहे. त्यामुळे बालिंगा अशुध्द आणि शुध्दजल, नागदेववाडी अशुध्द जल उपसा केंद्राला विद्युत पुरवठा होणार नाही. त्यामुळे पाणी उपसा पूर्णपणे बंद राहणार आहे. परिणामी बालिंगा जल उपसा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागाचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार आहे.

Advertisement

शहरातील ए, बी, सी, डी वॉर्डमधील संपूर्ण भागाला पाणीपुरवठा होणार नाही. तर ई वॉर्डमधील खानविलकर पेट्रोलपंप परिसर, शाहुपूरी ५, ६, ७ आणि ८ वी गल्ली, कुंभार गल्ली आणि बागल चौक परिसराला पाणी पुरवठा होणार नाही.

Advertisement
Tags :

.