कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निम्म्या शहरात आज पाणीबाणी

11:37 AM Dec 09, 2024 IST | Pooja Marathe
Water shortage in half the city today
Advertisement
कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी बालिंगा सब स्टेशनच्या 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीचे मासिक देखभाल दुरुस्तीचे कामकाज करणार आहे. या कामामुळे विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे आज, सोमवार, निम्या शहरातील पाणी पुरवठा बंद असणार आहे. उद्या, मंगळवार अपुरा व कमी दाबाने पाणी येणार आहे. तीव्र पाणी टंचाई होणाऱ्या परिसरात मनपा टँकरने पाणीपुरवठा करणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन मनपाने केले आहे.
पाणीपुरवठा बंद राहणार परिसर
लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही भाग. संपूर्ण सी डी वॉर्ड दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ तालिम, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदु चौक, आझाद चौक परिसर, उमा टॉकीज परिसर, महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब व त्यात सलग्नित ग्रामिण भाग व उपनगरे तसेच ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक
Advertisement
Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article