For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिरशिंगे धरण प्रकल्प लवकरच सुरू केला जाईल

05:42 PM Aug 13, 2025 IST | अनुजा कुडतरकर
शिरशिंगे धरण प्रकल्प लवकरच सुरू केला जाईल
Advertisement

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आमदार केसरकरांना आश्वासन

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी.

आमदार दीपक केसरकर यांनी पर्यटन , शिरशिंगे धरण प्रकल्प , हत्तीप्रश्न ,वन्यप्राणी , कबुलायतदार गावकर जमीन वाटप , खाजगी वनजमीन वाटप आधी विविध प्रश्नांसंदर्भात वनमंत्री गणेश नाईक, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई या चार मंत्र्यांची मुंबई येथे भेट घेतली . त्यांच्यासमोर विविध प्रश्न मांडले . सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिरशिंगे धरण प्रकल्प लवकरच सुरू केला जाईल असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले . तर शिरोडा - वेळागर येथील पंचतारांकित हॉटेल्स व पाणबुडी प्रकल्पही लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील असे आश्वासन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.वनमंत्री गणेश नाईक यांनी हत्ती हटाव मोहीम लवकरच घेण्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल व कबुलायतदार जमीन प्रश्न, खाजगी वन जमिनीच्या प्रश्नासंदर्भातही निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कबुलायतदार जमीन संदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.

Advertisement

Advertisement
Tags :

.