For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोंधळी गल्लीत जलवाहिनी कामाला सुरुवात

11:51 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोंधळी गल्लीत जलवाहिनी कामाला सुरुवात
Advertisement

बेळगाव : एलअॅण्डटी कंपनीकडून मुख्य जलवाहिनी घालण्याचे काम पुन्हा एकदा गोंधळी गल्लीत हाती घेण्यात आले आहे. मात्र, स्थानिक रहिवाशांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता कामाला सुरुवात केल्याने याला नागरिकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे नगरसेवक शंकर पाटील यांनी स्थानिक रहिवासी व एलअॅण्डटी अधिकाऱ्यांमध्ये समजूत काढून बुधवारपासून सदर कामाला सुरुवात झाली आहे. गोंधळी गल्लीत 24 तास पाणी योजनेसाठी मुख्य जलवाहिनी घालण्याचे काम गेल्या 8 महिन्यांपासून अर्धवट स्थितीत होते. पण एलअॅण्डटीकडून परिसरात घरोघरी नळजोडणी करण्यासह जलवाहिनी घातली आहे.

Advertisement

त्यातच अचानक मुख्य जलवाहिनी घालण्यासाठी दोन दिवसांपूर्वी अचानक खोदकाम हाती घेण्यात आले. स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आल्याने त्याला स्थानिक रहिवाशांनी आक्षेप घेतला. त्यामुळे स्थानिक नगरसेवक शंकर पाटील यांनी मध्यस्थी करत एलअॅण्डटीच्या अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी बोलावून घेतले. लोकांची समजूत काढत तातडीने जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात यावे, जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही. याबाबत दक्षता बाळगावी, अशी सूचना करून प्रत्यक्षात बुधवारपासून मुख्य जलवाहिनी घालण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जलवाहिनी घालण्यासाठी खोदकाम करण्यात आल्याने गोंधळी गल्लीतील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.