For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जलवाहिनी फुटल्याने कणबर्गी-मुचंडी रस्त्यावर पाणी

12:54 PM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
जलवाहिनी फुटल्याने कणबर्गी मुचंडी रस्त्यावर पाणी
Advertisement

बेळगाव : हिडकल जलाशयाहून हलगा येथील सुवर्णविधानसौधकडे जाणारी जलवाहिनी फुटल्याने कणबर्गी-मुचंडी रस्त्यावर 50 फूट उंच पाण्याचे फवारे उडाले. बुधवारी रात्री ही घटना घडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. हिडकलहून सुवर्णसौधकडे पाणी घेऊ जाण्यासाठी पाईपलाईन घालण्यात आली आहे. सदर पाईपलाईन 8 ते 10 इंची असल्याचे समजते. बुधवारी रात्री अचानक पाईपलाईन फुटली. त्यामुळे डांबरी रस्ता चिरून पाण्याचा फवारा सुमारे 50 फूट उंच उडत होता. परिणामी कणबर्गी ते मुचंडी दरम्यानच्या मार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, रात्री उशिरापर्यंत पाणी वाया जात होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.