महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेकिनकेरे-गोजगा संपर्क रस्त्यावर पाणी

10:49 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाहतूक ठप्प, वाहनधारकांचे हाल, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष 

Advertisement

बेळगाव : अति पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊ लागली आहे. बेकिनकेरे-गोजगा संपर्क रस्त्यावर गुडघाभर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. आधिच रस्त्याची दुर्दशा त्यातच पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मागील आठ दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले आणि तलावांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अतिरिक्मत पाणी इतरत्र वाहू लागले आहे. बेकिनकेरे-गोजगा मार्गावर शिवारातील पाणी आल्याने रस्त्यावर पाणी साचून आहे. त्यामुळे येथून ये-जा करणे बंद झाले. हा रस्ता वाहतुकीस बंद झाल्याने उचगावमार्गे वाहनधारकांना जावे लागत आहे. त्यामुळे नाहक त्रासही सहन करावा लागत आहे. संबंधीत लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे येथील नागरिकांना फटका बसला आहे. विशेषत: रस्त्यावर पाणी आल्याने शेतीकडे ये-जा करणेही कठीण झाले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article