For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डेथ व्हॅलीत कोरड्या हवेतून मिळविले पाणी

06:11 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
डेथ व्हॅलीत कोरड्या हवेतून मिळविले पाणी
Advertisement

वैज्ञानिकांकडून ‘मॅजिकल डिव्हाइस’ची निर्मिती

Advertisement

भीषण उष्णता आणि वाळवंटादरम्यान कुठलीही वीज, प्लग किंवा बॅटरीशिवाय केवळ उन्हाच्या मदतीने पिण्याचे स्वच्छ पाणी तयार करता आले तर. हा विचार सायन्स फिक्शन चित्रपटातील दृश्याप्रमाणे वाटत असलातरीही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी याला वस्तुस्थिती करून दाखविले आहे.

वैज्ञानिकांनी एक मोठा आविष्कार केला आहे. प्रसिद्ध कॅमिस्ट उमर याघी यांच्या नेतृत्वात संशोधकांच्या एका टीमने एक असे पोर्टेबल ‘वॉटर हार्वेस्टर’ उपकरण तयार केले आहे, जे जगातील सर्वात तप्त आणि कोरड्या ठिकाणांपैकी एक डेथ व्हॅलीच्या हवेतूनही पाणी मिळवू शकते. हातांमध्ये सहजपणे पकडता येणारे हे उपकरण कुठल्याही बाह्या ऊर्जास्रोत किंवा मूव्हिंग पार्ट्सवर निर्भर नाही. हे पूर्णपणे सूर्याच्या नैसर्गिक प्रकाशावर काम करते. हे उपकरण एमओएफ म्हणजेच मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कचा वापर करते, जे एक अत्यंत अधिक छिद्रयुक्त क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे.

Advertisement

एमओएम-303 तंत्रज्ञान

या उपकरणात अॅल्युमिनियम आधारित एमओएफ-303 (मेटल ऑर्गेनिक फ्रेमवर्क) मटेरियलचा वापर करण्यात आला आहे, जे अत्यंत स्पंजसारखे आणि छिद्रयुक्त असते.

रात्रीच्या वेळी आर्द्रता शोषून घेणे

वाळवंटात रात्रीच्या वेळी हवेत जेव्हा किंचित ओलावा असतो, तेव्हा हे मटेरियल पाण्याच्या अणूंना स्वत:मध्ये शोषून घेतो. दिवसा ऊन या मटेरियलवर पडतातच शोषून घेतलेले पाणी वाफ होऊन बाहेर पडते आणि उपकरणाच्या थंड हिस्स्याला आदळून कंडेंस (तरल) होत कंटेनरमध्ये जमा होते.

कमी आर्द्रतेतही उपयुक्त

सर्वसाधारणपणे आर्द्रतायुक्त भागांमध्ये हवेतून पाणी निर्माण करणे सोपे असते. परंतु वाळवंटात रिलेटिव्ह ह्यूमिडिटी 20 टक्के किंवा त्याहून कमी असते, तेथे ओसांक मायनसमध्ये जात असतो. अशास्थितीत पारंपरिक ड्यूमिडिफायर पूर्णपणे अपयशी ठरतात. डेथ व्हॅलीत हार्वेस्टरने दिवस-रात्रीच्या एका चक्रात प्रति किलोग्रॅम एमओएफ-303 द्वारे 210 ग्रॅमपर्यंत पाणी मिळविले, जे त्या ठिकाणी टीमकडून नोंदविण्यात आलेले सर्वाधिक आउटपूट होते. याच्या तुलनेत बर्कलेच्या हलक्या आणि अधिक आर्द्रतायुक्त हवेत त्याच उपकरणाने अशाप्रकारच्या पॅसिव ऑपरेशनमध्ये प्रति किलोग्रॅम प्रतिदिन 285 ग्रॅमपर्यंत पाणी मिळविले. परंतु बर्कलेमध्ये काही दिवसांची सरासरी कमी राहिली. या संशोधनाचे निष्कर्ष नेचर वॉटर नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. डेथ व्हॅलीचे नवे तंत्रज्ञान, एमआयटीच्या मॅकेनिकल इंजिनियर्ससोबत मिळून याघी आणि त्यांच्या टीमकडून 6 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्य मटेरियल चाचणीचा पुढील टप्पा आहे.

2017 मध्ये एमआयटीसोबत मिळून तयार करण्यात आलेल्या प्रारंभिक मॉडेलमध्ये जिरकोनियम-आधारित एमओएफ-801 चा वापर करण्यात आला होता, ज्याची किंमत सुमारे 160 डॉलर्स प्रतिकिलोग्रॅम होती. परंतु नव्या शोधत अॅल्युमिनियमचा वापर करत याला केवळ 3 डॉलर्स प्रतिकिलोग्रॅमच्या खर्चावर आणले गेले आहे. खर्चात 98 टक्क्यांची मोठी घट झाल्याने हे तंत्रज्ञान आता सामान्य लोकांच्या आवाक्यात येणार आहे.

उपकरणाचा छोटा आकार आणि त्यातून दररोज मिळणाऱ्या पाण्याचे मर्यादित प्रमाण, केमिकल रिअॅक्शनमागील संकल्पनेला सिद्ध करण्यासाठी अधिक योग्य होते. एमओएम केमिस्ट्रीच्या आधारावर यापुढे आणखी विकास करण्यात आल्याने उत्पादनात मोठी वाढ झाली आहे आणि आमच्या कंपनीने अधिक प्रभावी उपकरण तयार करण्यास सुरुवात केली, जे दरदिनी शेकडो लिटर पाणी तयार करू शकते असे वैज्ञानिकांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.