For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चालता-फिरता मोबाइल पाहणे ठरतोय जागतिक धोका

06:45 AM Jul 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
चालता फिरता मोबाइल पाहणे ठरतोय जागतिक धोका
Advertisement

वाढत आहेत दुर्घटना

Advertisement

रस्त्यावर चालताना मोबाइल फोनमध्ये डोकावणे आता केवळ एक खराब सवय नव्हे तर जागतिक सार्वजनिक सुरक्षा संकट ठरत आहे. जपान, भारत, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि युरोपच्या अनेक देशांमध्ये मोबाइल स्क्रीनमध्ये बुडालेल्या पादचाऱ्यांशी निगडित दुर्घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. स्मार्टफोनच्या वापरामुळे लोकांची सतर्कता आणि पाहण्याची क्षमता प्रभावित होते, यामुळे टक्कर, कोसळणे आणि रस्ते दुर्घटनांचा धोका अनेक पटीने वाढत असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.

जपानची राजधानी टोकियोच्या इकेबुकुरो रेल्वेस्थानकावर 78 वर्षीय महिलेची चालताना मोबाइल फोन पाहणाऱ्या इसमासोबत टक्कर झाली. यामुळे महिला जखमी झाली. ही घटना जपानमध्ये अरुकी-सुमाहोवरून (चालताना स्मार्टफोनचा वापर) अनेक वर्षांपासून जागरुकता अभियान राबविले जात असताना ही घटना घडली आहे.

Advertisement

2025 मध्ये 45 प्रकरणांची नोंद

टोकियो अग्निशमन विभागानुसार 2021-25 दरम्यान मोबाइल पाहत चालणे किंवा सायकल चालविण्याशी निगडित दुर्घटनांमुळे 171 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. 2025 मध्येच अशी 43 प्रकरणे नोंद झाली. यात पडणे, जिने किंवा प्लॅटफॉर्मवरून घसणे तसेच लोक किंवा वस्तूंना धडकणे प्रमुख कारण राहिले. जपानची राष्ट्रीय पोलीस एजेन्सीनुसार 2025 मध्ये मोबाइल वापराशी निगडित 148 गंभीर किंवा घातक रस्ते दुर्घटनाही नोंद झाल्या.

भारतातील स्थिती

भारतात मोबाइल वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढत आहे. ट्रायनुसार देशात मोबाइल कनेक्शन्सची संख्या 100 कोटीहून अधिक आहे, तर कोट्यावधी लोक स्मार्टफोन्सचा वापर करत आहेत. परंतु भारतात चालताना मोबाइलचा वापर केल्याने होणाऱ्या दुर्घटनांचा स्वतंत्र राष्ट्रीय डाटाबेस नाही, महानगरं, रेल्वे स्थानक, मेट्रो नेटवर्क आणि बाजारपेठांमध्ये ही समस्या वेगाने वाढत असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.