वॉशिंग्टन पहिल्या कसोटीतून बाहेर
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात लंकेच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात उभय संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. मात्र भारताचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर तंदुरुस्तीच्या समस्येमुळे पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध राहू शकणार नाही. तसेच अष्टपैलू नितिशकुमार रे•ाr आणि हर्षित राणा यांना दुखापत झाल्याने तेही या दौऱ्यासाठी उपलब्ध होण्याची शक्यता दुरावली आहे.
भारत आणि लंका यांच्यातील ही कसोटी मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत राहिल. या मालिकेतील पहिली कसोटी गॅले येथे 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान तर दुसरी कसोटी 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान कोलंबोत खेळविली जाणार आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराह संदर्भातही दुखापतीमुळे साशंकता व्यक्त केली जात आहे. सलामीचा फलंदाज साई सुदर्शन याला मात्र या दौऱ्यापूर्वी आपली शारीरिक तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागेल.