Miraj Crime : टाकळीतील 'त्या' मयत महिलेचे अर्धे शरीर हिंस्त्र प्राण्याने खाल्ले ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय
टाकळी शेतातील गूढ मृत्यू; हत्या की प्राणी हल्ला?
मिरज : तालुक्यातील टाकळी येथे ओढ्यालगत ऊसाच्या फहात छीन्नविछीन्न अवस्थेत मिळालेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ अद्यापही कायम आहे. ही हत्या, अपघात की घातपात, असा संशय व्यक्त होत आहे.
दरम्यान, सदर महिलेवर कोणत्या तरी हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याचा संशय असून, छातीपासून शरिराचा वरील भाग कोणत्या तरी हिंस्र प्राण्याने खाल्ला असल्याचे पोलीस तपासातून समोर येत आहे. मयत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
टाकळी येथे ओढ्यालगत असलेल्या कुमार चवगोंडा पाटील (रा. बोलवाड)यांच्या शेतातील ऊसाच्या फडात एका महिलेचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. मयत महिलेच्या तोंडावर व अंगावर प्रचंड जखमा आढळल्या. छीन्नविछीन्न मृतदेह असल्याने मृत महिलेचा चेहराही अस्पष्ट होता. त्यामुळे तिची ओळख पटली नाही.
सदर महिलेवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. मयत महिलेच्या अंगावर काळी साडी, हिरवा परकर, काळ्या रंगाचा ब्लाऊज, डाव्या पायात काळ्या रंगाचा दोरा, डाव्या हातात लाल धागा, पायात जोडवी, उजव्या पायातील अंगठ्याला काळा दोरा बांधलेला आहे. तसेच पिवळा, निळा आणि गळ्यात रंगातील नक्षी असलेली शाल मिळाली आहे.