युद्धनौका तुशील लवकरच भारतात
रशियातील कॅलिनिनग्राड येथे निर्मिती : ब्रह्मोससह अन्य क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता : वेस्टर्न फ्लीट मुंबईमध्ये दाखल होणार
वृत्तसंस्था/ कॅलिनिनग्राड
अत्याधुनिक शस्त्रांस्त्रs आणि नेव्हिगेशन असणारी आणि रशियामध्ये बांधणी केलेली आयएनएस तुशील लवकरच भारतात दाखल होणार आहे. या युद्धनौकेमध्ये 26 टक्के स्वदेशी सामग्री वापरण्यात आली आहे. वेस्टर्न फ्लिटच्या मुंबई तळामध्ये या युद्धनौकेचा समावेश असणार आहे. गेल्या महिन्यात 9 डिसेंबर 2024 रोजी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीमध्ये ती नौदलाला सुपूर्त करण्यात आली आहे. सध्या ती बाल्टिक समुद्र, उत्तर समुद्र, अटलांटिक महासगार आणि हिंदी महासागरातून प्रवास करत आहे. अनेक मित्र देशांच्या बंदरावर थांबून अखेरीस मुंबईत दाखल होणार आहे. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची शक्ती अधिक विशाल होणार आहे.
आयएनएस तुशील ही नवीनतम स्टेल्थ मिसाईल फ्रिगेट आहे. रशियाकडून ही भारतासाठी मोठी भेट ठरणार आहे. यामुळे भारताची समुद्री ताकद आणखी वाढणार आहे. आयएनएस तुशील ही फ्रिगेट 17 डिसेंबर 2024 रोजी रशियाच्या कॅलिनिनग्राड येथून भारतासाठी रवाना झाली आहे.. आयएनएस तुशील रशियामध्ये बांधण्यात आली आहे. sतरीही या युद्धनौकेच्या उभारणीमध्ये 26 भारतीय सामग्री वापरण्यात आली आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नौदलात कार्यान्वित करण्यात आले होते. त्याकरता भारतीय नौदलाचे विशेष पथक रशियाला रवाना झाले होते.
सध्या आयएनएस तुशील ही आयएनएस तुशील बाल्टिक समुद्र, उत्तर समुद्र, अटलांटिक महासागर आणि शेवटी हिंदी महासागरातून प्रवास करत आहे. या दरम्यान तुशील भारताच्या अनेक मित्र देशांच्या बंदरांवर थांबेल. तेथील नौदलाबरोबर सराव करेल, असे नौदलाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
आयएनएस तुशील हा प्रकल्प 1135.6 चे प्रगत क्रिवाक घ्घ्घ् श्रेणीचे फ्रिगेट आहे. जे भारतीय नौदलात आधीच सेवेत असलेल्या इतर सहा जहाजांशी संबंधित आहे. या जहाजात 26टक्के स्वदेशी सामग्री वापरली आहे. ते मागील टेग-क्लास फ्रिगेट्सपेक्षा दुप्पट आहे. त्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ब्रह्मोस एरोस्पेस (भारत-रशियाचा संयुक्त उपक्रम) आणि नोव्हा इंटिग्रेटेड सिस्टम्स (टाटा ?डव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेडची उपकंपनी) सारख्या 33 कंपन्यांनी यामध्ये योगदान दिले आहे.
आयएनएस तुशील हे युद्धाच्या संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये चार आयामांमध्ये (हवा, पृथ्वी, पाणी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक) ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. युद्धनौका अनेक प्रगत शस्त्रांनी सुसज्ज आहे. यामध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र, जमिनीवरून हवेत मारा करणारे प्रगत क्षेपणास्त्र, ऑप्टिकली नियंत्रित क्लोज रेंज रॅपिड फायर गन सिस्टम टॉर्पेडो, रॉकेट आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि संप्रेषण सूट.
आयएनएस तुशीलबद्दल माहिती देताना अधिकऱ्यांनी सांगितले की, ते मुंबईतील वेस्टर्न फ्लीटचा एक भाग असेल. तसेच भारतात पोहोचण्यापूर्वी आयएनएस तुशील पश्चिम आफ्रिकेच्या किनारपट्टीवरील गिनीच्या आखातामध्ये चाचेगिरी विरोधी गस्त देखील करेल. या महिन्यात ते भारतीय बंदरात दाखल होईल, असे सांगितले.