महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराणी येसूबाई यांच्या स्फूर्ती स्थळासाठी उपोषणाचा इशारा ! शृंगारपूरात पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

01:59 PM Sep 09, 2024 IST | Abhijeet Khandekar
Sringarpur
Advertisement

रत्नागिरी प्रतिनिधी

स्वराज्याच्या कुलमुखत्यार व छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे शृंगारपूर येथे भव्य स्फूर्ती स्थळ व्हावे या मागणीसाठी साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेश शिर्के हे आक्रमक झाले आहेत . या मागणीसाठी येत्या 9 सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण करण्याचा इशारा राजेशिर्के यांनी निवेदनाद्वारे दिला आहे

Advertisement

यासंदर्भात सुहास राजेशिर्के यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद आहे की स्वराज्यासाठी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली अठरापगड जातीच्या लोकांनी आपल्या जिवाचे रान केले त्यातील राजेशिर्के व ईतरही आणेक घराण्यांशिहि खुद्द शिवरायांची सोयरीक होती .यापैकीच एक राजेशिर्के घराण्याने आपले तन-मन धन अर्पण केले आहे . छत्रपती संभाजी महाराजांच्या पट्टराणी कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्य संकटात असताना अत्यंत धीरोदात्तपणे या संकटाचा सामना केला .संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांचे रक्षण केले .तब्बल 29 वर्ष त्या मुघल बादशाह औरंगजेबाच्या नजर कैदेत होत्या बंदीवासातही त्यांनी शाहू महाराजांवर उत्तम संस्कार केले आणि कर्तुत्वान राजा घडवला मात्र येसूबाईंचे हे कर्तुत्व इतिहासाच्या पानांमध्ये झाकोळल्यासारखे आहे .

Advertisement

या कर्तुत्ववानकुलमुखत्यारसम्राज्ञीचे समाधीस्थळ लोकस्मृतीतून नष्ट व्हावे ही दुर्दैवाची बाब आहे . राजधानी सातारा येथील इतिहास संशोधकांनी येसूबाईंचे समाधीस्थळ शोधून काढले आहे त्याच्या संवर्धनासाठीचा पाठपुरावा आम्ही सातत्याने करत आहोत .येसूबाई यांचे माहेर असलेले शृंगारपूर हे गाव देखील अजूनही दुर्लक्षित आहेत .कधीकाळी या गावात त्यांच्या पितृकुल राजेशिर्के घराण्याचा फार मोठा वाडा येथे होता, सरंजाम होता .परंतु या घडीला त्याचे भग्नावशेष मिळणे ही दुर्मिळ झाले आहे अशा या विस्मृतीत गेलेल्या शृंगारपूर या गावी त्यांच्या कर्तुत्वाला साजेसे स्फूर्ती स्थळ उभे राहावे म्हणून इतिहास संवर्धनासाठी सत्याग्रह म्हणून आम्ही आमरण उपोषण सुरू करीत आहोत . हे उपोषण रत्नागिरी जिल्ह्याचे प्रशासन असणाऱ्या येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर 9 एप्रिल पासून सुरू होणार आहे . या आंदोलनात मा.उपनगराध्यक्ष सुहास राजे शीकै व शृंगारपूरचे सरपंच विनोद भिकाजी पवार सहभागी होणार आहेत .

शृंगारपूरच्या वाड्यातच येसूबाईंचे बालपण सरले याच ठिकाणी अनेक वेळा छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य होते आणि दुर्दैवाने याच भागातील एका वाड्यात त्यांना अटक झाली एवढा मोठा ऐतिहासिक वारसा या पटलावरून दुर्लक्षित झालाआहे . या ठिकाणी येसूबाईंचे स्फूर्तीस्थळ होणे गरजेचे आहे त्यांच्या कर्तुत्वाचा इतिहास दुर्लक्षिला जाता कामा नये हे स्मारक उभे न राहिल्यास पुढच्या पिढीला या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या बलिदानाचा इतिहास कळणार नाही . यासाठीच आम्ही हा आमरण उपोषणाचा अट्टाहास करत आहोत अशी कळकळीची भावना सुहास राजेशिर्के व लोकनीयूकत सरपंच विणोद भीकाजी पवाय श्रंगारपूर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केली आहे

 

Advertisement
Tags :
Warning of hunger strike for Maharani Yesubai's burial place Sringarpur
Next Article