जिल्ह्यात उद्या ‘अतिमुसळधार’चा इशारा
06:56 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. प्रतिनिधी
Advertisement
रत्नागिरी :
भारतीय हवामानशास्त्र विभागाने 31 जुलै रोजी रत्नागिरी आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांनी तसेच मच्छीमारांनी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Advertisement
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 30 जुलै रोजी पावसाचा जोर कायम राहून काही भागात मुसळधार सरी कोसळतील. 31 जुलै रोजी रत्नागिरीत पावसाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. यादिवशी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर 1 आणि 2 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर काहीसा ओसरून मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू राहील. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने संपूर्ण कोकणपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Advertisement